विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवाब मलिक, प्राजक्त तनपुरे आणि आता हसन मुश्रीफ यांच्यासारखे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्या जाळ्यात अडकल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बोलावलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर “विशेष मंथन” करण्यात आले. नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही असा सूर या बैठकीत उमटला… Nawab Malik ED in ncp meeting resignation
… पण या बैठकीनंतर नवाब मलिक यांची पुढची “राजकीय वाटचाल” मंत्रिपदाचा राजीनाम्याकडेच चालली असल्याचे दिसून येत आहे…!!
– मुंबई प्रदेशाध्यक्ष पद काढून घेणार
नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात येणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली आहे. शरद पवार यांनी आज बोलावलेल्या बैठकीत देखील याचा पुनरुच्चार करण्यात आला. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांच्याकडे मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद आहे. आता त्यांच्या ऐवजी कार्यकारी अध्यक्ष नेमून त्या पदाची सूत्रे राष्ट्रवादीच्या मुंबई महापालिकेतल्या गटनेत्या नगरसेविका राखी जाधव यांच्याकडे देण्याचे निश्चित झाल्याचे समजते.
– नवाब मलिक यांचे पंख कापले
याचाच अर्थ नवाब मलिक यांच्याकडून मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पद काढून घेण्याची ही प्रक्रिया आहे. त्याचबरोबर त्यांना सध्या तरी मंत्रिपदावर कायम ठेवून पक्ष पातळीवरचे मुंबई प्रदेश अध्यक्ष पद काढून घेण्याचे घाटत असल्याने घेऊन त्यांना पक्षाच्या निर्णयातून बाजूला केले जात असल्याचे मानले जात आहे.
– दाऊदशी मनी लॉन्ड्रिंग भोवले
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर तिच्याबरोबरच्या जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करण्याच्या आरोपात नवाब मलिक हे ईडी कोठडीत पोचल्यानंतर सुरुवातीला शरद पवार यांनी नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणार नाही, असे जाहीर केले होते. तीच भूमिका आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत देखील निश्चित करण्यात आली. पण नवाब मलिक यांच्याकडून मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे काढून घेतल्यामुळे एक प्रकारे त्यांचे राजकीय पंख कापण्यात आल्याचे देखील स्पष्ट होत आहे.
आजच्या बैठकीला शरद पवार यांच्यासमवेत प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित असल्याचे समजते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App