विशेष प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा सर्वत्र जोर धरला असताना नाशिकमध्येही मुसळधार पाऊस पडतो आहे. नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून रामतीर्थ गोदावरी समितीची आज भर पावसात आरती झाली. या आरतीमध्ये भाविक अत्यंत उत्साहाने सहभागी झाले. Nashik Godavari Aarti
नाशिक मधल्या पुराचा मापदंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंडया मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले होते. भाविकांनी या मारुतीपाशी गोदावरी आरती केली. रामतीर्थ गंगा गोदावरी समितीचे सचिव मुकुंद खोचे गुरुजी यांनी आरतीचे पौरोहित्य केले.
Nepal : ४० भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, १४ जणांचे मृतदेह बाहेर काढले
पाटबंधारे विभागाने आज दुपारीच 4 हजार 970 क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग 4 वाजता सोडणार असल्याची सूचना आधी दिली होती. त्यानुसार पाणी सोडले गेले.
गोदावरीत पाणी अधिक वाढण्याची शक्यतेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यानं टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्याची शक्यता असल्याचेही पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App