Narendra Modi : पंतप्रधान म्हणाले, लखपती दीदी संमेलनासाठी जळगावला जाण्यासाठी मी उत्सुक

Narendra Modi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लखपती दीदी संमेलनात सहभागी होण्यासाठी, उद्या, 25 ऑगस्ट रोजी, महाराष्ट्रात जळगाव येथे जाण्यास मी उत्सुक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. Narendra Modi Jalgaon for the Lakhpati Didi meet

या कार्यक्रमात 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. ही योजना महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बचत गटांसोबत काम करणाऱ्या लक्षावधी महिलांना लाभ देण्यासाठी 2500 कोटी रुपयांचा निधी जारी केला जाणार आहे, असे पंतप्रधानांनी एक्स या सोशल नेटवर्किंग साइटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

जळगाव येथे २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील ‘लखपती दीदी संमेलन’ तसेच समुदाय संसाधन व्यक्तींचा सन्मान सोहळा होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील स्वयंसहाय्यता गटांना २५०० कोटी रुपयांचा फिरता निधी व ५००० कोटींचे बँक अर्थसहाय्य वितरणाचाही कार्यक्रम होणार आहे. ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, ग्रामविकास व पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासन, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानाअंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे

नरेंद्र मोदी २५०० कोटींचा निधी वितरीत करणार असून ४ लाख ३० हजार बचत गटातील तब्बल ४८ लाख सदस्यांना या निधीचा लाभ होणार आहे. तसेच ५००० कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरीत करणार आहेत त्याचा फायदा बचत गटातील २५. ८ लाख सदस्यांना होईल. लखपती दीदी योजनेची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत १ कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत. भविष्यात ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष मोदी सरकारचे आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरातील कोट्यावधी लखपती दीदी निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या ध्येयाकडे एक पाऊल म्हणून महाराष्ट्रात २५ लाख लखपती दीदी बनण्याचे कार्य पूर्णत्वास जात आहे.

लखपती दीदींचे वार्षिक उत्पन्न किमान एक लाखापेक्षा जास्त होण्यासाठी त्यांना दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यवसाय संधी निर्माण करून दिल्या जाणार आहेत. अभियानातील महिलांना बॅंकेचे व्यवहार शिकविले जातात त्यांना आर्थिक साक्षर केले जाते. कृषीविषयक माहितीसाठी अभियानात कृषीसखी आहेत, बँकविषयक मदतीसाठी बँक सखी, अशा विविध क्षेत्रात प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्ती अभियानात आहेत. सेच मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्धीसाठी अनेक राष्ट्रीयीकृत बँकाकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. उमेद अभियानात २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात एकूण ८ हजार ९७४ कोटी रुपये कर्ज वितरण करण्यात आले असून आज पर्यंतच्या इतिहासातील हे सर्वात मोठे कर्ज म्हणून देखील गणले गेले आहे.

Narendra Modi Jalgaon for the Lakhpati Didi meet

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात