ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई यांचे निधन


मुस्लिम सत्यशाेधक मंडळाचे संस्थापक सदस्य सय्यदभाई यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यातील रुग्णालयात निधन झाले आहे.Muslim satyashodhak manadal founder member padmashree sayyadbhai death age of ८७


विशेष प्रतिनिधी

पुणे- मुस्लिम सत्यशाेधक मंडळाचे संस्थापक सदस्य सय्यदभाई यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यातील रुग्णालयात निधन झाले आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे एक आठवडयापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने शुक्रवारी त्यांची प्राणज्याेत मालवली. सन २०२० मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पदमश्री किताब प्रदान केला हाेता. Muslim satyashodhak manadal founder member padmashree sayyadbhai death age of ८७

सय्यदभाई यांचे पाठीमागे पत्नी अख्तर, मुलगा आसीम, सून, एक नात व एक नातू असा परिवार आहे. सहा एप्रिल १९३६ राेजी सय्यदभाई यांचा जन्म झाला. मुस्लीम समाजातील महिलांचे प्रश्न, अनिष्ट रुढी परंपरा याबाबत जागृती करण्याचे काम त्यांनी केले. ‘दगडावरची पेरणी’ ही आत्मकथा त्यांनी लिहलेली आहे.



३० मार्च राेजी त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना इनामदार रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. परंतु प्रकृतीत सुधारणा हाेऊ न शकल्याने शुक्रवारी दुपारी दाेन वाजून दहा मिनिटांनी त्यांची प्राणज्याेत मालवली. शुक्रवारी संध्याकाळी काेंढवा मधील काैसरबाग दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहे.

Muslim satyashodhak manadal founder member padmashree sayyadbhai death age of ८७

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात