सिल्वर ओक वर चप्पल फेक : चोरांचे सम्राट म्हणत शरद पवारांविरुद्ध एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश; तर सत्ताधाऱ्यांचा भाजपवर निशाणा!!


प्रतिनिधी

मुंबई : “चोरांचे सम्राट” अशा जोरदार घोषणा देत संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी स्वरूप दगडफेक मी चप्पल फेक केली. पण या आंदोलनावरून विरोध सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र भाजपवर निशाणा साधला आहे.ST workers’ outcry against Sharad Pawar calling him emperor of thieves

एसटी कर्मचारी आज दुपारी अचानक शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओक वर पोहोचले आणि त्यांनी घरा बाहेर उभे राहून दगडफेक आणि चप्पल फेक केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी बाहेर येऊन एसटी कर्मचाऱ्यांची बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या कर्मचाऱ्यांना हात जोडून शांततेचे आवाहन केले. परंतु संतापलेले कर्मचारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

“चोरांचे सम्राट शरद पवार” अशा घोषणा त्यांनी दिल्या. शरद पवारच आमच्या वाईट अवस्थेत कारणीभूत आहेत. ते आमचे हाल ऐकायला तयार नाहीत, असा आक्रोश एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी, महिलांनी सिल्वर ओक समोर चालवला होता. शांतता झाली नाही म्हणून सुप्रिया सुळे परत घरामध्ये निघून गेल्या.

आई वडिलांची आणि माझ्या मुलीची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यांना बघून मी परत येते आपण चर्चा करू, असे त्या म्हणून आत मध्ये गेल्या. परंतु त्या बाहेर येण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना एका बस मध्ये भरून परत आझाद मैदानात पाठवले होते. सुप्रिया सुळे यांनी नंतर बाहेर येऊन आपली शांततेत चर्चेची तयारी असल्याचे पत्रकारांना सांगितले.

या आंदोलनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाच्या विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. परंतु ज्यांना महाराष्ट्रातली परिस्थिती चिघळवायची आहे. ते आंदोलनाला चिथावणी देत आहेत असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते मावळते खासदार संजय राऊत यांनी केला आहे, तर शरद पवारांनीच एसटी विलीनीकरणाच्या आश्वासन राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात दिले होते मग त्यांनी ते पाळले का नाही?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. आता शरद पवार यांच्या निवासस्थानी बाहेर आंदोलन झाल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब अनिल परब यांच्या निवासस्थानाबाहेरचा बंदोबस्त वाढवला आहे.

ST workers’ outcry against Sharad Pawar calling him emperor of thieves

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण