लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबईतल्या हिरानंदानी इस्टेट या सोसायटीत राहणाऱ्या 30 मे रोजी 390 जणांना कोव्हिशिल्ड ही लस देण्यात आली. सोसायटीच्या आवारातच लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती.
मुंबईतील लसीकरण घोटाळ्यावरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. Mumbai Vaccination Scam: Uddhav Sarkar asleep like Kumbhakarna; Shiv Sena and BJP face to face
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव सरकार या ना त्या कारणावरून सदैव चर्चेत आहे . नुकतेच मुंबईच्या कांदिवलीमधील हिरानंदानी सोसायटीत झालेल्या लसीकरण घोटाळ्याच्या वृत्त प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली . मुंबईत अशा घटना घडत असतात तेव्हा BMC आणि राज्य सरकार काय झोपा काढतात का असा सवाल उपस्थित होत आहे . याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना ताब्यातही घेतलं आहे.आता याच प्रकरणावरुन शिवसेना आणि भाजप मात्र आमनेसामने आले आहेत.
मुंबईतील लसीकरण घोटाळा समोर आल्यानंतर भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना आमदार राम कदम असं म्हणाले की, ‘मुंबईसारख्या शहरात एका हायप्रोफाइल सोसायटीत काही लोक जाऊन सांगतात की, आम्ही एका मोठ्या रुग्णालयातून आलो आहोत. ते त्यांच्यासाठी लस घेऊन येतात. नंतर समजतं की, हा एक घोटाळा आहे. लसीचं कोणतंही सर्टिफिकेट नाही.’ ‘लसीच्या नावाखाली त्यांनी शेकडो लोकांना काय दिलं आहे त्याचा लोकांच्या शरीरावर काय दुष्परिणाम होणार आहे. याबाबत कोणाला काहीही माहिती नाही. मुंबई आणि महाराष्ट्रात उद्धव सरकार कुंभकर्णाच्या निद्रावस्थेत आहे.’
@CPMumbaiPolice https://t.co/nfZ7T6jdhr https://twitter.com/ramkadam/status/1405001563655999493?s=20
‘मागील दीड वर्षात काय-काय घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. संपूर्ण देशात महाराष्ट्राचं नाव बदनाम करण्याचं काम या सरकारने केलं आहे. वसुलीमधून यांना वेळ मिळाला तर ते प्रशासनाच्या मागे लागून अशा प्रकारच्या घटना रोखतील.’
‘संपूर्ण देशात अशाप्रकारची घटना कुठेही घडली नाही. त्या घटना मुंबई आणि महाराष्ट्रात घडत आहे. महाराष्ट्र सरकारमधील तीन पक्ष हे आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत.’ असं म्हणत राम कदम यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांवर टीका केली आहे.
दरम्यान, राम कदम यांच्या या टीकेला शिवसेना नेते कृष्णा हेगडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘एखाद्या सोसायटीमधील सुशिक्षित सदस्यांची (तिथे राहणाऱ्या डॉक्टरांसह) जेव्हा दिशाभूल केली गेली तर त्याला राज्य सरकार कसे काय जबाबदार आहे?’
‘आपल्या स्वतःच्या युक्तिवादानुसार प्रभाग/मतदारसंघात स्थानिक भाजपचे आमदार आणि नगरसेवक दिवसा झोपा काढत होते का?’ असं म्हणत कृष्णा हेगडे यांनी राम कदमांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण देखील लागलं आह
काय आहे प्रकरण ?
राजेश पांडे नावाचा एक जण यासाठी सोसायटीत आला होता त्याने आपण कोकिलाबेन अंबानी रूग्णालयाचे आहोत असं सोसायटीच्या कमिटी मेंबर्सना सांगितलं. संजय गुप्ता यांनी हे लसीकरण शिबीर घेतल आणि महेंद्र सिंग यांनी सोसायटीतल्या सदस्यांकडून लसींचे पैसे घेतले अशी माहिती आरोप करणाऱ्यांनी दिली आहे.
तसंच आम्हाला लस घेतल्यानंतर कोणतेही फोटो किंवा सेल्फीही काढू दिले गेले नाहीत. 1260 रूपये एका डोससाठी या प्रमाणे सोसायटीतल्या 390 जणांनी लसीकरण शिबीर आयोजित करणाऱ्याला पाच लाख रूपय दिले.
आम्ही ज्या-ज्या सदस्यांनी लस घेतली त्यापैकी एकालाही कोणतेही साईड इफेक्ट म्हणजे ताप येणं, अंग दुखणं असं काहीही झालं नाही. एवढंच काय आम्हाला लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचं प्रमाणपत्रही दिलं गेलं नाही. त्यामुळे आम्ही हा नेमका काय प्रकार घडला आहे याचा शोध घेण्यास सुरूवात केली. साधारण 15 दिवस गेल्यानंतर आम्हाला प्रमाणपत्रं देण्यात आली. मात्र असं कोणतंही शिबीर रूग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलं नव्हतं असं रूग्णालयाने स्पष्ट केल्याने आम्हाला बनावट लस दिले गेले असा आरोप आता रहिवाशांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App