आशांची निराशा ! जीवावर उदार होऊन 12-12 तास काम- मानधन 35 रुपये ;माझं कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम फत्ते करणार्या आशांची जबाबदारी ठाकरे सरकार कधी घेणार?

आशांना मानधन ठाकरे सरकार का देत नाही ?


गेले वर्षभर कोरोनात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या 72 हजार आशा वर्कर व गटप्रवर्तकांना राज्य सरकारने फुटकी कवडीही कोरोनाच्या कामापोटी दिलेली नाही. केंद्र सरकारकडून कोरोना भत्ता म्हणून महिन्याला 1000 रुपये म्हणजे प्रतिदिन 35 रुपये दिले जातात.


आशा वर्कर्सने गंभीरतेने आपले काम करत ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम सफल केली व आज मोठ्या प्रमाणात कोरोनावर अंकुश ठेवण्यात यश आलं आहे. असे असताना देखील आशा वर्कर्सकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.


दिवसाचे 12-12 तास काम करुन फक्त प्रतिदिन 35 रुपयेच मानधन मिळत असल्याने आता आशा वर्कर्सने संप पुकारला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री आशा वर्कर्संना मानाचा मुजरा करतात, कृतज्ञता व्यक्त करतात, आरोग्य व्यवस्थेचा कणा असल्याचे सांगतात पण त्यांना योग्य मानधन सरकार का देत नाही? असा भावूक सवाल आशांनी सरकारला विचारला आहे. कोरोना संदर्भातील 8 ते 12 तास काम करायचे आणि फक्त 35 रुपये मानधन. हे मानधन आहे आशा वर्कर्सचे… कोरोनाला रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबादारी’ ही मोहीम फत्ते करण्यात सर्वात मोठा वाटा होता तो आशा वर्कर्सचा. असे असताना मात्र यांच्या ‘आशांची पूर्णत: निराशा ठाकरे सरकारने केली आहे. Disappointment of hope! Being generous with one’s life and working for 12 hours – honorarium 35 rupees

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारबरोबर डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी खांद्याला खांदा लावत प्रयत्न करत आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली आणि ही योजना सफल ही झाली.त्याचे मुख्य कारण म्हणजे आशा वर्कर्स यांचे कष्ट ,त्यांची मेहनत. गावोगावी जाऊन या आशा वर्कर्सने लोकांचे पल्स, ऑक्सिमेटर, तपासणं आणि त्यांच्या आरोग्याच्या वेगवेगळ्या नोंदी करण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे. एका आशा वर्करला किमान 50 घरं रोज करावी लागतात.

याशिवाय आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरणापासून रुग्ण तपासणीत मदत करावी लागते. शिवाय आरोग्य विभागाचे डॉक्टर सोपवतील ती कामे करावी लागतात. साधारणपणे 8 ते 12 तास काम करून घेतले जाते. त्याबद्दल महिन्याकाठी त्यांना मिळतात फक्त 1000 रुपये. म्हणजे रोजचे साधारण 35 रुपये दिले जातात.

नियमानुसार कोरोनापूर्व काळात आरोग्याचे काम आठवड्यातून चार दिवस व रोज दोन ते चार तास करणे बंधनकारक होते. कोरोना काळात आशा वर्कर्स रोज 8 ते 12 तास काम करत असून राज्य सरकारचं आरोग्य विभाग यासाठी एक रुपयाही देत नाही.

जीवाची पर्वा न करता कोरोनाचे काम करणाऱ्या आशा वर्कस किंवा त्यांच्या कुटुंबीयांना कोणतेही विमा कवच, आरोग्य संरक्षण नाही. आजारी पडल्यामुळे कामावर आले नाही तर मानधन कापले जाते.

अशावेळी आता कामाचे किमान 18 हजार रुपये मासिक मिळाले पाहिजे आणि आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ठोक मदत व कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. अशीही मागणी केली गेली पण ते देखील झालं नाही.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मास्क, हातमोजे, सॅनिटाइजर आदी गोष्टी आशा वर्कर्संना मिळाल्या, मात्र गेल्या वर्षभरात बहुतेक ठिकाणी काहीच दिले नाही. हे योग्य आहे का? तुम्हीच विचार करा असा सवालच आशा वर्कर्स उपस्थित करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही. अशी भूमिका आता आशा वर्कर्सने घेतली आहे.

Disappointment of hope! Being generous with one’s life and working for 12 hours – honorarium 35 rupees

महत्त्वाच्या बातम्या