विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील बदली आणि पोस्टिंगशी संबंधित कथित फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांना समन्स बजावले आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना 14 आॅक्टोबर रोजी सायबर सेलच्या मुंबई कार्यालयात रिपोर्ट करण्यास सांगितले आहे.Mumbai police summons CBI director, inquiry into phone tapping case
जयस्वाल यांच्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाच्या कार्यकाळात राज्यातील अनेक प्रमुख लोकांचे फोन टॅप करून त्यांच्याशी संबंधित कागदपत्रे लीक केल्याचा संशय आहे. 1985 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी जयस्वाल यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) प्रमुख म्हणून या वर्षी मे महिन्यात दोन वर्षांच्या मुदतीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.
मुंबई पोलिसांचे सायबर सेल या प्रकरणाचा अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत तपास करत आहे. त्याचवेळी, मुंबई उच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करत आहे. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, जयस्वाल यांना ई-मेलद्वारे समन्स पाठवण्यात आले आहेत, त्यांना पुढील गुरुवारी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
हे संपूर्ण प्रकरण 2020 साली राज्याच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या गुप्तचर विभागाच्या आयुक्त होत्या. त्यांनी 25 ऑगस्ट 2020 रोजी तत्कालीन डीजीपी सुबोध जयस्वाल यांना एक गुप्तचर अहवाल पाठवला. त्यात अनेक आयपीएस अधिकारी आणि मंत्र्यांचे फोन टॅप झाल्यानंतर त्यांच्या संभाषणाचा तपशील होता.
जयस्वाल यांनी हा अहवाल तत्कालीन एसीएस होम सीताराम कुंटे यांना नोटिशीसह सादर केला होता आणि चौकशीची मागणी केली होती. या अहवालाच्या आधारे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मोठ्या बदली रॅकेटचा आरोप केला होता. त्यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे अनेक तासांचे रेकॉर्डिंग सादर केले होते.
या प्रकरणात, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला, ज्या इंटेलिजन्स विंगच्या कमिशनर होत्या, त्यांची चौकशी सुरू आहे. रश्मी शुक्लांवर आरोप आहे की त्यांनी केवळ परवानगीशिवाय अनेक लोकांचे फोन टॅप केले नाहीत, तर विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्याचे रेकॉर्ड लीक करून आपल्या पदाचा गैरवापर केला. रश्मी शुक्ला यांनी 2019 दरम्यान फोन टॅप केले होते.
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या आदेशानुसार, या प्रकरणी मुंबईच्या सायबर सेलमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला. तथापि, ही एफआयआर अज्ञात व्यक्तीविरोधात होती, त्यामुळे रश्मी शुक्ला एफआयआरमध्ये आरोपी नाही. यापूर्वी राज्याचे मुख्य सचिव सीताराम जे कुंटे यांनीही रश्मी शुक्लाविरोधात चौकशी केली होती आणि त्याचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला आहे.
अहवालात रश्मी शुक्लावर फोन टॅपिंग आणि खोटी कारणे देऊन माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर सरकारची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. आयपीएस अधिकारी शुक्ला यांनी भारतीय टेलीग्राफ कायद्याअंतर्गत फोन टॅपिंगसाठी अधिकृत परवानगीचा गैरवापर केल्याचे अहवालात म्हटले आहे. शुक्ला यांनी देशाच्या सुरक्षा प्रकरणाच्या आधारावर फोन टॅपिंगची परवानगी घेतली होती, परंतु त्यांनी सरकारची दिशाभूल केली आणि वैयक्तिक कॉल रेकॉर्ड केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App