नर्सिंगचे शिक्षण घेऊन आयएएस अधिकारी झालेल्या कर्नाटकातील एनीस जॉय यांच्यामुळे कोडगु हा जिल्हा कोरोनामुक्त होण्यास मोठी मदत झाली. विशेष म्हणजे त्यांनी घेतलेल्या नर्सिंग शिक्षणाचा फायदा हा कोरोना नियंत्रणासाठी झाल्याचे स्पष्ट होते. तसेच कोणतेही ज्ञान कधीही वाया जात नाही. ते जीवनात कधी तरी उपयोगी पडतेच, हे या उदाहरणावरून सिद्ध होते. Taking exact advantage of knowledge of nursing education Kodagu district corona free by Ennis Joy
बंगळुरू : एनीस कानमनी जॉय या कर्नाटक राज्यातील कोडगु जिल्ह्याच्या उपायुक्त आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी त्यांनी जिल्ह्यात केलेल्या कार्याचे व प्रयत्नांचे कौतुक वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही केले आहे. Taking exact advantage of knowledge of nursing education Kodagu district corona free by Ennis Joy
जूनच्या मध्यापर्यंत कोडगु जिल्हा पुन्हा अनलॉक करण्याचे प्रयत्न सुरु झाले.कारण जिल्ह्यात सलग दोन दिवस कोरोनाचे एकही प्रकरणे आढळले नव्हते. जिल्ह्यात कडक कंटेनमेंट झोन लागू केल्याचा हा सकारात्मक परिणाम होता. त्यांच्या या निर्णयामुळे हा आमूलाग्र बदल जिल्ह्यात घडला.
हा जिल्हा अगोदर कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे त्रस्त होता. नंतर परिस्थिती कठोर उपययोजनांमुळे निवळत गेली. किमान १४० प्रकरणे १९ जुलैपर्यंत होती. इतर जिल्ह्याच्या तुलनेत अत्यंत कमी रुग्ण या जिल्ह्यात आढळले होते. याचे श्रेय सर्वस्वी एनीस यांच्या कर्तव्यदक्षतेला जाते.
विशेष म्हणजे नर्सिंगचे शिक्षण घेऊन २०१२ मध्ये आयएएस अधिकारी म्हणून निवड झालेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. यापूर्वी जिल्ह्यात भुस्खलन आणि पुराचा सामना करण्याचे आव्हान त्यांनी लीलया पेलले आहे. या संकटाचा सामना करण्यात त्या आघाडीवर होत्या.
एनीस यांनी २०१२ मध्ये ६५ व्या क्रमांकासह नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्रिवेंद्रम वैद्यकीय महाविद्यालयातून नर्सिंगमध्ये बीएससी केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App