नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अखेर स्व पक्ष वाढवण्यासाठी राजकीय कार्यक्रम सापडला आणि मनसेने मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे त्यावरच्या सुविधा या विरुद्ध रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पदयात्रा आंदोलन चालविले. मुंबईकरांना आणि कोकण वासियांना या आंदोलनाद्वारे राजकीय दृष्ट्या आकर्षित करण्याची मनसेची योजना आहे. Mumbai Goa national highway agitation by MNS, but it’s political target is uddhav thackeray’s shivsena
मुंबई विद्यापीठातल्या निवडणुका अचानक पुढे ढकलल्याच्या निमित्ताने अमित ठाकरे कार्ड ऍक्टिव्हेट झाले होते, ते ऍक्टिव्हेट झालेले कार्ड तसेच ऍक्टिव्हेट राहावे त्याचबरोबर आपला मनसे पक्ष खळखट्याकच्या पुढे जावा, यासाठी राज ठाकरे सातत्याने प्रयत्न करत होते. त्यांचे अधून मधून महाराष्ट्रातल्या काही गावा – शहरांमध्ये मेळावे देखील झाले. त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. पण राज ठाकरेंसाठी भाषणाला मिळणारा प्रतिसाद हा कधीच “समस्याग्रस्त” नव्हता, प्रश्न त्या पुढचाच होता. राज ठाकरेंच्या भाषणाला गर्दी आणि मतदानाच्या मशीनवरची मतपेटी मात्र खाली!!, ही त्यांना समस्या होती. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी वक्तृत्वाला राजकीय कर्तृत्वाची जोड आवश्यक होती आणि या राजकीय कर्तृत्वासाठीच मनसेने मुंबई – गोवा महामार्गाचे निमित्त करून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पदयात्रा काढल्या आहेत.
अमित ठाकरेंचे नेतृत्व
स्वतः अमित ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्ग यात्रा आंदोलन याचे नेतृत्व केले आहे. पळस्पे येथून सुरू झालेली यात्रा कोलाडला पोहोचेल आणि तिथे राज ठाकरे जाहीर सभेला संबोधित करतील. पण या पदयात्रेत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश गावे राजकीय दृष्ट्या कव्हर करण्याची मनसेची योजना आहे आणि इथेच खरी मनसेच्या राजकीय खेळीची कसोटी आहे.
पळस्पे फाटा ते खारपाडा ह्या श्री. अमित ठाकरे ह्यांच्या कोकण जागर यात्रेतील काही क्षणचित्रं. नव्या उमेदीसाठी, कोकणाच्या उत्कर्षासाठी, महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना. #कोकणजागरयात्रा pic.twitter.com/hfgfx6VAwS — MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 27, 2023
पळस्पे फाटा ते खारपाडा ह्या श्री. अमित ठाकरे ह्यांच्या कोकण जागर यात्रेतील काही क्षणचित्रं. नव्या उमेदीसाठी, कोकणाच्या उत्कर्षासाठी, महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना. #कोकणजागरयात्रा pic.twitter.com/hfgfx6VAwS
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 27, 2023
पदयात्रेला उद्धवसेनेतून भांडवल आणि इंधन
मुंबई – गोवा महामार्ग 15000 कोटींच्या घोटाळ्यात का अडकला??, या प्रश्नावर उत्तर काय?? आत्ता शांततेत पदयात्रा काढतोय, पण पुढचा मार्ग खळखट्याक कडे जाऊ शकतो, अशी इशारायुक्त भाषा अमित ठाकरेंनी केली. मनसेच्या सर्व प्रमुख नेत्यांनी पदयात्रा सुरू करताना शिंदे – फडणवीस सरकारवर तोंडी तोफा डागल्या, पण त्या पलीकडे जाऊन रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पदयात्रा काढून मनसेने जे राजकीय आक्रमण चालविले आहे, ते मात्र कोकणातल्या उद्धव सेनेवर चालविले आहे. कारण पदयात्रा आंदोलनात जास्तीत जास्त राजकीय भांडवल आणि इंधन उद्धवसेनेतूनच इकडे मनसेत आले आहे.
रत्नागिरी मध्ये उद्धव सेनेचे विनायक राऊत खासदार आहेत. रायगड मध्ये सुनील तटकरे खासदार आहेत. या दोघांच्या राजकीय वाटचालीत मनसेच्या या पदयात्रा आंदोलनामुळे मोठा अडथळा उत्पन्न होणार आहे.
कोकणात शिवसेना नेहमीच बळकट होती. रायगडचा काही अपवाद वगळता शिवसेनेला तिथे चॅलेंज नव्हते. पण आधी शिंदे सेनेने आणि आता मनसेने हे जबरदस्त आव्हान उद्धवसेने पुढे उभे केले आहे. पण उद्धवसेने पुढचे आव्हान जास्त मोठे आहे. कारण मनसेच्या पदयात्रा आंदोलनात उद्धवसेनेतीलच काही नेते राज ठाकरेंना सामील झाल्याचे रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केले आहे.
याचा अर्थ उरलेली शिवसेना देखील कोकणात संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेच्या पदयात्रा आंदोलनात तोंडी तोफा शिंदे फडणवीस सरकारवर, पण प्रत्यक्षात संघटनात्मक तोडफोड मात्र उद्धवसेनेची असा परिणाम मनसे साधत आहे. याचा अर्थच मनसे पाऊल पडते पुढे, पण कोकणात उद्धव सेना अडखळे असा आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App