नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपूर्ण देशाचा राजकीय नकाशा बदलायची तयारी; पण ठाकरे + पवार खेळत बसलेत घरातल्या घरात “खेळी”!!, हेच राजकीय वास्तव आज सगळ्या देशासमोर आणि महाराष्ट्रासमोर आले. Modi
महिला आरक्षणातून मोदींचा राजकीय “खेळ”
नारीशक्ती वंदन अधिनियम अर्थात महिला आरक्षणाच्या निमित्ताने मोदींनी देशाचा राजकीय नकाशा पूर्ण बदलून टाकायची तयारी चालवली आहे. त्यासाठी उद्यापासून म्हणजेच 16 एप्रिल पासून संसदेचे विशेष अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण आणि लोकसभा – विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेचा आणि संख्यावाढीचा विषय चर्चेला येऊन तो मंजूर होणार आहे. काँग्रेस सकट बाकीच्या विरोधकांनी या विषयाला विरोध केला असला, तरी देशाच्या माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या प्रतिभाताई पाटील आणि लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांच्या पाठिंबा मिळविण्यात नरेंद्र मोदींना यश आले आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेच्या मुद्द्यावर मोदींनी काँग्रेसला बॅकफूटवर ढकलले आहे. त्याचा परिणाम बाकीच्या विरोधी पक्षांवर सुद्धा झाला असून त्यांच्या मनात काँग्रेस विषयी संशय पेरणी झाली आहे.
ठाकरे + पवार अडकलेत घरातल्या खोड्यात
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार संपूर्ण देशाचे राजकारण ढवळून काढणारा, देशाचा राजकीय नकाशा बदलणारा निर्णय घेण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. लोकसभेच्या मतदारसंघांची संख्या 543 वरून 816 होणार आहे. तशाच अनुपातात सर्व राज्यांच्या विधानसभांच्या मतदारसंघांची संख्या प्रचंड वाढणार आहे. हे सगळे राजकारण नरेंद्र मोदी नावाचे गुजरात मधून आलेले पंतप्रधान घडवून आणत आहेत, पण त्याच वेळी महाराष्ट्रात फार मोठ्या आणि बड्या नेतृत्वाचे ढोल पिटलेले ठाकरे आणि पवार मात्र घरातल्या घरात “खेळी” करायच्या खोड्यात अडकलेत.
आदित्य ठाकरे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी
उद्धव ठाकरे म्हणे, आदित्य ठाकरे यांना शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्त करून त्यांच्याकडे संपूर्ण शिवसेनेची धुरा द्यायच्या बेतात असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. बातम्यांना संजय राऊत यांनी सुद्धा दुजोरा दिलाय. अर्थात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष करणार म्हणजेच बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे कार्याध्यक्ष करण्यासारखेच आहे. बाळासाहेबांनी आपल्या मुलाकडे शिवसेनेची धुरा सोपवली, उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाकडे शिवसेनेची धुरा सोपवली. यापेक्षा यात वेगळे काही घडले नाही आणि घडण्याची शक्यता नाही. म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांनी घरात सुरू केलेला खेळ उद्धव ठाकरे यांनी पुढे नेण्या पलीकडे यात काहीही नाही.
पवारांच्या घरातल्या घरातच “खेळ”
जे ठाकरेंचे तेच पवारांचे. शरद पवार म्हणे आता पुणे जिल्ह्यातून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची पुनर्बांधणी करण्यासाठी दौरा काढणार आहेत. म्हणजेच शरद पवारांवर स्वतःच्या जिल्ह्यातच स्वतःच्या पक्षाच्या पुनर्बांधणीची वेळ आल्याचे यातून दिसून येत आहे. मूळात पवारांना स्वतःच्या जिल्ह्यात पक्षाची पुनर्बांधणी करावी लागते, हीच त्यांच्या राजकीय करिअरची इतीश्री झाल्याचे मानावे लागेल. कारण पवारांना 86 व्या वर्षी राज्यसभेचे खासदार होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आतून मदत घ्यावी लागली. ती मदत घेतल्यानंतर पवार पुन्हा मूळ भूमिकेत आले. त्यांनी वारकरी संप्रदायावर प्रतिगामीत्वाची टीका केली आणि आता पक्षाच्या पुनर्बांधणीच्या निमित्ताने ते स्वतःच्याच पुणे जिल्ह्यात फिरणार आहेत, अशी बातमी समोर आली. म्हणजेच हा पवारांचा सुद्धा घरातल्या घरातच “खेळ” ठरलाय.
पवारांना इतरांचा नकोय नेतृत्वात वाटा
एकीकडे बारामतीच्या पोटनिवडणुकीत सगळ्या पवार कुटुंबाला एकत्रित प्रचारात गुंतावे लागत असताना ही राजकीय घडामोड घडत आहे. याचा अर्थ सुनेत्रा पवारांचा सुद्धा घरातल्या घरातच राजकीय खेळ सुरू आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे नेतृत्व त्यांच्या राष्ट्रवादीत प्रस्थापित करण्यासाठी सगळे पवार कुटुंब झटत आहे. कारण राष्ट्रवादी नावाच्या लेबलवर पवार नावाची छाप राहणे कठीण दिसू लागले आहे. पक्षाच्या कारभारात इतर नेत्यांना वाटा देणे पवारांना सहन होईनासे झाले आहे म्हणूनच पवारांवर घरातल्या घरात “खेळ” करायची वेळ आली आहे.
कर्तृत्वाची राजकीय वळणे
इथे मोदी आणि ठाकरे + पवार यांच्यात राजकीय तुलना करण्याचा विषयच नाही. कारण मोदींचे राजकीय कर्तृत्व देशपातळीवर उजळलेय, ठाकरेंचे राजाशकीय कर्तृत्व प्रांत पातळीवरून पलीकडे गेले नाही. पवारांचे राजकीय कर्तृत्व देशाच्या पातळीवरून घसरून प्रांताच्या पातळीवर आले आणि नंतर ते स्वतःच्या गावाच्या किंवा जिल्ह्याच्या पातळीवर येऊन ठेपलेय!!, तरीही मराठी माध्यमे ठाकरे + पवारांच्या बड्या नेतृत्वाचे ढोल बडविण्यात मग्न आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App