दीर्घकाळाचे राजकीय स्वप्न साकार; हिंदी पट्ट्यातल्या बिहारच्या मुख्यमंत्री पदावर भाजपचे सम्राट चौधरी!!

नाशिक : दीर्घकाळाचे राजकीय स्वप्न साकार करत भाजपने असे हिंदी पट्ट्यातल्या बिहारमध्ये आपला मुख्यमंत्री बसविण्यात आज 14 एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिवशी यश मिळविले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपने विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सम्राट चौधरी यांची निवड करून त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा केला. Samrat Choudhary

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत हिंदी पट्ट्यातल्या बिहारमध्ये पक्षाचा मुख्यमंत्री बसविण्याचे स्वप्न पाहिले होते. बिहार वर दीर्घकाळ काँग्रेस आणि नंतर समाजवादी विचारांचा पगडा राहिला होता. त्यामुळेच काँग्रेसचे श्रीकृष्ण सिन्हा यांच्यापासून ते जगन्नाथ मिश्रा यांच्यापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले, पण त्यानंतर समाजवादी विचारांच्या पार्श्वभूमीचे लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांनी बिहार वर 30 पेक्षा जास्त वर्षे राज्य केले.

या दीर्घ कालावधीत भाजपला बाकीच्या राज्यांमध्ये आपले राजकीय हात पाय पसरता आले. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये भाजपला दीर्घकाळ सत्ता मिळाली. त्या पक्षाचे अनेक मुख्यमंत्री त्या राज्यांमध्ये झाले. 2014 नंतर तर हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये सुद्धा भाजपला इतर पक्षांना बाजूला करून सत्ता मिळवता आली. आपले मुख्यमंत्री त्या राज्यांमध्ये बसवता आले. कर्नाटक सारख्या दक्षिणी राज्यात सुद्धा भाजपने काही काळ सत्ता मिळवून दाखवली. पूर्वेकडेच्या राज्यात ओरिसामध्ये सुद्धा भाजपला सत्ता मिळाली.

– बिहारमध्ये सत्तेसाठी भाजपचा संघर्ष

पण स्वतःची प्रचंड ताकद असलेल्या हिंदी पट्ट्यातल्या बिहार आणि झारखंड या दोन राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळवताना फार संघर्ष करावा लागला. त्यातच झारखंडमध्ये भाजपाला फक्त एखाद दुसरी टर्म सत्ता मिळाली, पण बिहार सारख्या हिंदी पट्ट्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपला सत्तेवर स्वतःची मांड ठोकता आली नव्हती.

– प्रभाव टिकवण्यात नितीश कुमार यशस्वी

2014 पासून निर्माण झालेल्या मोदी लाटेत सुद्धा भाजपला बिहारमध्ये एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त यश मिळू शकले नव्हते. सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपला नितीश कुमार यांच्यापेक्षा जास्त जागा मिळून सुद्धा मुख्यमंत्री पद मिळवता आले नव्हते. ते नितीश कुमार यांनी स्वतःकडे टिकवून ठेवण्यात यश मिळविले होते. 2014 पासून 2026 पर्यंत भाजपने बिहारमध्ये अनेक राजकीय प्रयोग केले. अनेक नेत्यांना पुढे – मागे सरकवून बघितले. नितीन नवीन यांना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवून भाजपने काही महिन्यापूर्वीच नवा प्रयोग केला. पण भाजपने नितीश कुमार यांना हात लावला नव्हता.



नितीश कुमार यांची वयाची 75 ओलांडल्या नंतर त्यांनाच आपल्या मुलाला राजकीय वारस करायची गरज निर्माण झाली त्यावेळी भाजपबरोबर त्यांनी तडजोड करून बिहारचे मुख्यमंत्री पद सोडून पुन्हा केंद्रीय राजकारणात जायचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांनी स्वतःहून राज्यसभेची निवड केली. त्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ते बिहारमध्ये तब्बल २० वर्षे मुख्यमंत्रीपदावर होते. अनेक चढ-उतार अनुभवून सुद्धा त्यांची बिहारच्या राजकारणावरील पकड मात्र त्यांनी ढिल्ली होऊ दिली नव्हती. लालू प्रसाद यादव यांच्याशी कधी संघर्ष तर कधी तडजोड करून त्यांनी बिहारच्या राजकारणावरचे आपली पकड मजबूत ठेवली होती.

– सम्राट चौधरी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी

पण आज नितीश पर्व संपले आणि सम्राट चौधरी यांच्याकडे मुख्यमंत्री पद आले. सम्राट चौधरी हे काही मुळातले संघ परिवाराच्या मुशीत तयार झालेले नेते नाहीत. त्यांचे वडील शकुनी चौधरी हे सुद्धा राजकारणात होते. सम्राट चौधरी यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवून लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातून राजकीय कारकीर्द सुरू केली होती. ते रबडी देवीच्या मंत्रिमंडळात मंत्री सुद्धा होते. 2018 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या राजकीय कारकीर्दीला नवे वळण दिले. 2020 मध्ये भाजपने सुशील कुमार मोदी यांना दिल्लीच्या राजकारणात आणले. त्यानंतर सम्राट चौधरीचे नाव भाजपचा प्रमुख नेता म्हणून बिहारमध्ये पुढे आणले गेले. बिहार मधल्या कुशवाह समाजातून ते येतात. त्यामुळे भाजप राजकीय आणि सामाजिक समीकरण पाहून त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली.

– बिहारचे बुलडोझर बाबा

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री पदाबरोबरच अर्थमंत्री आणि गृहमंत्री राहिले. गृहमंत्री म्हणून त्यांनी आपली प्रतिमा बिहारचा बुलडोजर बाबा म्हणून तयार केली. 2025 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपने नितीश कुमार यांच्या पक्षापेक्षा जास्त जागा मिळवून सुद्धा त्यांनाच मुख्यमंत्री केले, पण त्याच वेळी नितीश कुमार यांची बिहार मधून “पॉलिटिकल एक्झिट” ठरविली गेली. त्यांच्यानंतर भाजपचाचणीचा मुख्यमंत्री होईल हे सुद्धा ठरविले गेले. त्याची अंमलबजावणी आज आंबेडकर जयंतीच्या दिवशी झाली.

Samrat Choudhary unanimously elected as the Leader of the BJP Legislative Party in Bihar.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात