
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव मध्ये 25 ऑगस्टला येऊन राज्यस्तरीय लखपती दीदी मेळावा घेणार आहेत. त्यानंतर त्यांचे महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक कार्यक्रम नियोजित आहेत, तरीदेखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात कार्यक्रम घेणे टाळत असल्याचा “जावईशोध” लावला आहे. Modi 25 august program jalgaon
रोहित पवार आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट लिहून पंतप्रधान मोदींवर टीका केली महाराष्ट्रातल्या भटकत्या आत्म्याच्या भीतीमुळे पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन कार्यक्रम घेण्याचे टाळत आहेत. एरवी वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या की दर एक-दोन दिवसात मोदी त्या राज्यांमध्ये जाऊन कार्यक्रम घेतात, पण महाराष्ट्रात मात्र भटकत्या आत्म्याच्या म्हणजेच शरद पवारांच्या भीतीपोटी मोदी येणे टाळत आहेत, असा दावा रोहित पवारांनी या पोस्ट मधून केला.
एक-दोन महिन्यात निवडणुका असणाऱ्या राज्यात दोन-तीन दिवसाआड कार्यक्रम घेणारे पंतप्रधान मोदी साहेब निवडणुका जवळ आल्या असतानाही महाराष्ट्रात कार्यक्रमास येणे टाळत आहेत. विकासाच्या बाबतीत तसेच बजेटमध्ये केंद्राकडून दुर्लक्षित झालेला महाराष्ट्र आता राजकीय बाबतीतही दुर्लक्षित होत…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 19, 2024
प्रत्यक्षात पंतप्रधान मोदींचा 25 ऑगस्ट रोजी जळगाव गावात मोठा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान मोदींनी लखपती निधीची योजना लोकसभा निवडणुकी आधीच सुरू केली. ती लोकसभा निवडणुकीनंतर ही सुरू ठेवली. आता त्याच लखपती दीदी योजनेचा महाराष्ट्र व्यापी शुभारंभाचा कार्यक्रम जळगावात होणार असून त्यासाठी मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर 30 ऑगस्टला वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणे अपेक्षित आहे. मोदींचे महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक कार्यक्रम नियोजित आहेत, तरी देखील रोहित पवारांनी मोदी महाराष्ट्रात येणे टाळत असल्याचा “जावईशोध” लावून तशी पोस्ट सोशल मीडिया अकाउंट वर लिहिली आहे.
Modi 25 august program jalgaon
महत्वाच्या बातम्या
- Rakesh Pal : भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे चेन्नईत निधन
- Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांची खुसपटे; पण वरचढ योजनेची तोड का न सापडे??
- Champai Soren : झारखंडच्या माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश!
- Sukanta Majumdar : ममतांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच राहणार ; सुकांता मजुमदार