विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झालेत. 25 वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा पडद्यामागे काय झाले त्यांना माहीत नाही. त्यामुळे मी त्यांना नमक हराम 2 ची पटकथा द्यायला तयार आहे, अशी टीका उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. Sanjay Raut says I will make Namak Haram 2 film
मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, राज ठाकरे पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे आमच्या सोबतच होते. ठाण्याच्या पलीकडे तेव्हा त्यांची काही मजल नव्हती. त्यामुळे त्यांना काय घडलं माहित नाही. शिंदे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झाले आहेत. नमक हराम-2 हा चित्रपट मी काढणार आहे त्यावेळेस सगळ्या पडद्यामागच्या पटकथा मी देणार आहे.एकनाथ शिंदे ज्यांच्या नादाला लागले आहेत ते सगळे ढोंगी, खोटारडे आहेत. लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर काय होणार ?
Kolkata rape : मृत्यूपूर्वी पीडितेला दिल्या जखमा, बलात्काराची पुष्टी, पण फ्रॅक्चर नाही; कोलकाता घटनेचा तपशीलवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर
विधानसभा निवडणूक पुढे ढकलणे हे संविधानाच्या विरोधात आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि मतदारांना विकत घेण्यासाठी ज्या योजना सुरु आहेत, सरकारी पैशातून हे करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून निवडणूक आयोग हे राजकारण्यांच्या हातातला हत्यार आणि बाहुलं बनणार असेल तर राज्यघटना धोक्यात आहे. महाराष्ट्रातील निवडणुका डिसेंबर महिन्यात होत असतील तर ती राज्यकर्त्यांची सोय आहे ज्यांना महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते की आम्ही निवडणूक हरू त्यांनी अशा पद्धतीने हा डाव टाकला आहे.
झारखंडची देखील निवडणूक हरियाणा बरोबर होण्यासाठी काही हरकत नव्हती. त्यांनी झारखंडची निवडणूक पुढे ढकलली कारण त्यांना हेमंत सोरेन यांचा मुक्ती मोर्चा फोडायचा आहे. महाराष्ट्रात देखील राजकीय गोष्टींसाठी या निवडणुका घेतल्या जात नाही. जर निवडणुका घ्यायला हे तयार नसतील तर ही हुकूमशाही आहे
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात कोण गंभीरतेने घेत नाही. संभाजी भिडे यांना उत्तर द्यायला मनोज जरांगे पाटील सक्षम आहेत. संभाजी भिडे यांच्या विषयी मला जास्त बोलायचं नाही. मात्र ते आरएसएस संबंधित काम करतात हे मला माहिती आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App