विशेष प्रतिनिधी
नागपूर : गडचिरोली भागात महाराष्ट्र पोलिसांच्या c60 पथकाने केलेल्या धडक कारवाईत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे हाही ठार झाला आहे. पण तो ठार झाल्यानंतर नक्षलवाद्यांची वेगळीच गोची झाली आहे आणि ही नक्षलवाद्यांची आर्थिक गोची आहे. पैशाअभावी गडचिरोली, छत्तीसगड भागात चळवळ कशी चालवायची? असा नक्षलवाद्यांना यक्षप्रश्न पडला आहे. Milind Teltumbde buried the money of the movement in the forest land … or … buried it ??; Naxals’ financial woes !!
मिलिंद तेलतुंबडे हा कुख्यात माओवादी नेता होता. त्याच्याकडे बरेच अधिकार होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नक्षलवाद्यांच्या पैशाचे सगळे व्यवहारही त्याच्याकडेच होते. त्याने चळवळीचे कोट्यवधी रूपये जमिनीच्या खाली गाडून ठेवल्याची माहिती मिळाली आहे. पण त्याने हा प्रचंड पैसा खरंच जमिनीत गाडला आहे की गडप केला आहे हे गुढ उकलताना नक्षलवादी हैराण झाले आहेत. मात्र त्याच्या मृत्यूबरोबर हे गुढ त्याच्याबरोबरच निघून गेले आहे. त्यामुळे चळवळ चालवण्यासाठी गरजेचा हा पैसा त्याने कुठे लपवला आहे, याचा शोध घेण्याची नक्षलवाद्यांची धावपळ सुरु आहे. हा पैसा तेलतुंबडेने जमिनीत गाडून ठेवल्याची काही नक्षलवाद्यांना पक्की माहिती आहे, मात्र घनदाट अरण्यात ते ठिकाण नक्की कुठे आहे, हे मात्र नक्षलवाद्यांना माहिती नसल्याने त्यांची गोची झाली आहे. हा पैसा किती आहे, याचाही अंदाज नाही. सध्या नक्षलवादी चळवळ चालवण्यासाठी पैशाची नितांत गरज आहे. असे असताना मात्र हा पैसा जर सापडला नाही, तर नक्षलवादी चळवळीच्या मोठ्या नुकसानीची भीती आहेच किंबहुना पैशांवरून नक्षलवादी चळवळीत उभी फूट पडण्याची भीतीही तयार झाली आहे.
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात ‘सी-६०’ पोलिसांशी झालेल्या चकमकीत शनिवारी २६ नक्षलवादी ठार झाले. सुमारे ९ तास चाललेल्या या चकमकीत मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाला. मिलिंद तेलतुंबडे हा कुख्यात माओवादी नेता होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो भूमिगत होता. तेलतुंबडे मूळचा महाराष्ट्रातील असून यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावचा रहिवासी होता. ३२ वर्षांपूर्वी त्याने चंद्रपूरला अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेतून कामाला सुरुवात केली होती. ‘वेकोलि’ कंपनीच्या अधिकाऱ्याच्या खुनानंतर तो बेपत्ता झाला. मिलिंद तेलतुंबडे नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य तसेच महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड क्षेत्रीय समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. कॉम्रेड एम, दीपक, सह्याद्री अशा वेगवेगळ्या नावांनी नक्षलवाद्यांमध्ये त्याची ओळख होती. कोरेगाव भीमा प्रकरणात अटकेत असलेल्या आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद तेलतुंबडे भाऊ आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा सूत्रधार अशी पोलिसांत त्याची नोंद आहे. १ मे २०१९ रोजी गडचिरोलीत कुरखेडा – जांभुळखेडाज पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामागे मिलिंद तेलतुंबडेचा हात असल्याचा संशय होता. मिलिंद तेलतुंबडेवर ५० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पण तो आता ठार झाला असल्याने नक्षलवाद्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App