Manikrao Kokate : गैरप्रकार म्हणजे भ्रष्टाचार नाही, माणिकराव कोकाटे यांचा अजब तर्क

Manikrao Kokate

विशेष प्रतिनिधी

जालना : Manikrao Kokate राज्यात धनंजय मुंडे कृषि मंत्री असताना पीकविमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. यावर गैरव्यवहार म्हणजे भ्रष्टाचार नाही असा अजब तर्क कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मांडला आहे.

जालना येथे आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी ते बोलत होते. यावर कोकाटे म्हणाले, पीक विमा योजना बंद करणार आहे हे कोणी सांगितले. त्यामध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे ते म्हणाले. विरोधकांनी आमच्या गैरप्रकाराचा अर्थ भ्रष्टाचार झाल्याचा काढला आहे. गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार आहे का?



ते म्हणाले, मी म्हटलं की फक्त दोन-चार टक्के गैरप्रकार होतात, पण गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आम्ही आता उपाययोजना करतोय. युनिक फार्मर आयडी ला आधार कार्डसोबत कनेक्ट करत आहोत असे कोकाटे म्हणाले. मात्र, जे मी म्हटलो नाही तेच तुम्ही लावून धरत आहात असंही ते म्हणाले. तुम्ही माझं भाषण बघा आणि बाईट बघा त्यामध्ये फक्त गैरप्रकार हा शब्द वापरलेला आहे. गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार नाही. आम्हाला कोणत्याही भ्रष्टाचाराला पाठीशी घालायचे नाही हा आमचा स्पष्ट मुद्दा आहे.
गैरप्रकार जर कोणी जर करत असेल तर त्यामध्ये अपडेशन करणं जरुरी आहे. विरोधकांनी आमच्या गैरप्रकाराचा अर्थ भ्रष्टाचार झाल्याचा काढला. मात्र तुम्हीही त्यांना विचारलं की भ्रष्टाचाराविषयी तुमचे मत काय? मग त्यांना तर चांगलं आहे घरबसल्या बडवायला मिळतं असे कोकाटे म्हणाले. अजितदादा आणि शरद पवार हे एकत्र येतील की नाही हे मला सांगता येणार नाही. वरिष्ठ पातळीवर त्यांची काय चर्चा झालेली आहे त्याबाबत मी अनभिज्ञ असल्याचे कोकाटे म्हणाले.

नाशिक पालकमंत्रीपदासंदर्भात देखील कोकाटे यांना विचारण्यात आले. त्या संदर्भात मला काही सांगता येणार नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा तो विषय आहे. माझा विषय नाही, त्यामुळं कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचा? हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळं त्याच्यावर कुठल्याही मंत्र्यांनी भाष्य करु नये असे कोकोटे म्हणाले.

कोणी नाराज आहे असं मला अजिबात वाटत नाही. पालकमंत्रीच काय तर तुम्हाला मंत्रीपद मिळालेला आहे. तुम्ही राज्यात काम करा ना. पालकमंत्र्यावरच काय येऊन अडकलं. मला देखील नंदुरबार जिल्हा आहे, त्यामुळं मी काही नाराज आहे का? असेही कोकाटे म्हणाले.

Manikrao Kokate said Misconduct is not corruption, the strange logic

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात