विशेष प्रतिनिधी
बीड : Valmik Karad बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मीक कराड याच्यामुळे आणखी एक पोलीस अधिकारी अडचणीत आला आहे. या दोघांतील फोन संवाद व्हायरल झाला आहे.Valmik Karad
वाल्मीक कराड आणि बीड शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांचा ऑडिओ कॉल सध्या व्हायरल होतोय. या मोबाईल कॉल मध्ये गुन्हेगार सनी आठवले याच्यावर कारवाई करू नका. त्याला कशात गुतवू नका. तो सध्या माझ्याकडे कार्यरत नसला तरीही तो माझ्या भावासारखा आहे. सध्या स्थानिक राजकारणामुळे योगेश याचे जमत नाही म्हणून तो सध्या तिकडे गेला आहे. असा संवाद व्हायरल झाला आहे. सनी हा सराईत गुन्हेगार आहे. आणि त्याच्या संबंधी वाल्मीक कराड आणि पोलीस निरीक्षक शितकुमार बल्लाळ यांच्यात थेट संवाद झाला असल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर क्लिप खोटी आहे. क्लिप मधील संवाद माझा नाही. सनी आठवले हा गुन्हेगार आहे. त्याचा भाऊ देखील गुन्हेगार आहे. सनी आठवले सध्या फरार असून यातील आवाज माझा नाही. याप्रकरणी मी गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App