Devendra Fadnavis मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्राची 15.70 लाख कोटींच्या करारांची भरारी, याचीच विरोधकांना पोटदुखी; फडणवीसांचा “पंच”!!

Devendra Fadnavis

 

विशेष प्रतिनिधी

मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल. पण मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार तसेच शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्याच कंपन्यांबरोबर करार करायचे तर दावोसलाच कशाला जायला पाहिजे??, असे खुळचट सवाल केले. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चपखल प्रत्युत्तर देऊन गप्प केले. Devendra Fadnavis

संबंधित कंपन्यांचे फॉरेन पार्टनर्स दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये येतात. तिथे त्या फॉरेन पार्टनर्स बरोबर भारतीय राज्यकर्त्यांनी चर्चा करावी अशी भारतातल्या कंपन्यांच्या प्रमुखांची इच्छा असते. त्यांच्या समवेत वेगवेगळ्या करारांवर स्वाक्षऱ्या करता याव्यात यासाठी दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये येऊन विविध जागतिक कंपन्यांचे प्रमुख तिथे हजर राहतात. पण याची विरोधकांना माहितीच नसेल तर त्यांना काय सांगायचे??, असा खोचक सवाल फडणवीस यांनी केला. महाविकास आघाडीच्या काळात 55 हजार कोटींचे करार झाले, पण आता मात्र 16 लाख कोटींचे करार झाले याचे कदाचित त्यांना दुःख असावे असा टोलाही फडणवीस यांनी हाणला.

आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले.

दुसरी मोठी गुंतवणूक ही अ‍ॅमेझॉन करणार असून, ती 71,795 कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून 83,100 इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या 2 दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने 11.71 कोटींचे करार केले असून, एमएमआरडीएने 3.44 लाख कोटी तर सिडकोने 55,200 कोटींचे करार केले आहेत.

– टोनी ब्लेअर यांची भेट

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान ही भेट झाली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली. टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलाएम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालक, सीईओ रिझवान सोमर यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रात इंडस्ट्रीयल पार्क, लॉजिस्टीक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली.


Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधी वरून खर्गे – पवार वाद; पण कुणी कुणाचा, का केला विश्वासघात??


*सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे:

21) सिएट
क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही
गुंतवणूक : 500 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : नागपूर

22) व्हीआयटी सेमिकॉन्स
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 24,437 कोटी
रोजगार : 33,600
कोणत्या भागात : रत्नागिरी

23) टाटा समूह
क्षेत्र : बहुविध क्षेत्रात
गुंतवणूक : 30,000 कोटी

24) रुरल एन्हान्सर्स
क्षेत्र : रुग्णालयादी सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक
गुंतवणूक : 10,000 कोटी

25) पॉवरिन ऊर्जा
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक: 15,299 कोटी
रोजगार : 4000

26) ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 15,000 कोटी
रोजगार : 1000

27) युनायटेड फॉस्परस लि.
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 6500 कोटी
रोजगार : 1300

28) ईरुलर्निंग सोल्युशन्स
क्षेत्र : शिक्षण
गुंतवणूक: 20,000 कोटी
रोजगार : 20,000

29) ऑलेक्ट्रा ईव्ही
क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही
गुंतवणूक: 3000 कोटी
रोजगार : 1000

30) फ्युएल
क्षेत्र : पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटीचा मनोदय
राज्यातील 5000 युवकांना एआय, डिजिटल मार्केंटिंग, बिझनेस अ‍ॅनालिटिक्सचे प्रशिक्षण
……….
दि. 21 जानेवारीपर्यंत
एकूण गुंतवणूक : 6,25,457 कोटी
एकूण रोजगार : 1,53,635
………….
दि. 22 जानेवारी रोजीचे सामंजस्य करार

31) रिलायन्स इंडस्ट्रीज लि.
क्षेत्र : पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट
गुंतवणूक: 3,05,000 कोटी
रोजगार : 3,00,000

32) ग्रिटा एनर्जी
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 10,319 कोटी
रोजगार : 3200
कोणत्या भागात : चंद्रपूर

33) वर्धान लिथियम
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स (लिथियम रिफायनरी, लिथियम बॅटरी)
गुंतवणूक : 42,535 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : नागपूर

34) इंडोरामा
क्षेत्र : वस्त्रोद्योग
गुंतवणूक : 21,000 कोटी
रोजगार : 1000
कोणत्या भागात : रायगड

35) इंडोरामा
क्षेत्र : टेक्निकल टेक्सटाईल्स
गुंतवणूक: 10,200 कोटी
रोजगार : 3000
कोणत्या भागात : रायगड

36) सॉटेफिन भारत
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक: 8641 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

37) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 43,000 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

38) सिलॉन बिव्हरेज
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 1039 कोटी
रोजगार : 450
कोणत्या भागात : अहिल्यानगर

39) लासर्न अँड टुब्रो लि.
क्षेत्र : संरक्षण उत्पादन
गुंतवणूक : 10,000 कोटी
रोजगार : 2500
कोणत्या भागात : तळेगाव

40) नेल्सन मिडिया प्रा. लि.
क्षेत्र : आयटी
गुंतवणूक: 450 कोटी
रोजगार : 1100
कोणत्या भागात : एमएमआर

41) इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि.
क्षेत्र : अंतरिक्ष आणि संरक्षण
गुंतवणूक : 12,780 कोटी
रोजगार : 2325
कोणत्या भागात : नागपूर

42) एमएसएन होल्डिंग्ज लि.
क्षेत्र : सौर
गुंतवणूक : 14,652 कोटी
रोजगार : 8760
कोणत्या भागात : नागपूर

43) प्रियम सोल्युशन्स प्रा. लि.
क्षेत्र : ड्रोननिर्मिती
गुंतवणूक : 300 कोटी
रोजगार : 300
कोणत्या भागात : जालना

44) रेनिसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक: 5000 कोटी
रोजगार : 1300
कोणत्या भागात : विदर्भ, मराठवाडा अथवा उत्तर महाराष्ट्र

45) हॅझेरो इंडस्ट्रीज
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 16,000 कोटी (दोन प्रकल्प)
रोजगार : 10,000
कोणत्या भागात : बुटीबोरी

46) टॉरल इंडिया
क्षेत्र: अ‍ॅल्युमिनियम आणि मेटल्स
गुंतवणूक : 500 कोटी
रोजगार : 1200
कोणत्या भागात : अहिल्यानगर

47) टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 43,000 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

48) हिरानंदानी समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 51,600 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

49) एव्हरस्टोन समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 8600 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

50) अ‍ॅमेझॉन
क्षेत्र : डेटा सेंटर
गुंतवणूक : 71,795 कोटी
रोजगार : 83,100
कोणत्या भागात : एमएमआर

51) युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिमिंगहम
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: शाश्वत परिवहन सुविधा कोणत्या भागात : एमएमआर

52) एमटीसी समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: सर्क्युलर इकॉनॉमी पार्क
कोणत्या भागात : एमएमआर

53) क्रॉसरेल इंटरनॅशनल
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: वाहतूक सुविधा कोणत्या भागात : एमएमआर
..
दि. 22 जानेवारीपर्यंत
एकूण गुंतवणूक : 15.70 लाख कोटी
एकूण रोजगार : 15.75 लाख

Maharashtra contracts worth Rs 15.70 lakh crore Davos visit CM Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात