Jalgaon जळगावमध्ये भीषण रेल्वे अपघात ; एका अफवेमुळे गेला १२ प्रवशांचा जीव

Jalgaon

जाणून घ्या, नेमकं काय घडलं? सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

विशेष प्रतिनिधी 

जळगाव  : जळगाव जिल्ह्यात एक भीषण रेल्वे अपघात घडला आहे जिथे ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि चेन खेचून ट्रेन थांबवण्यात आली. ट्रेन थांबताच प्रवाशांनी दुसऱ्या ट्रॅकवर जाण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळी तेथून जाणारी दुसरी ट्रेन त्यांच्यासाठी जीवघेणी ठरली आणि तिने प्रवाशांना चिरडले. या भीषण अपघातता १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव रेल्वे अपघातात एक नवीन अपडेट आली आहे ज्यामध्ये जळगावचे एसपी महेश्वर रेड्डी यांनी अपघातातील मृतांची संख्या १२ वर पोहोचल्याची पुष्टी केली आहे. यामध्ये ९ पुरुष आणि ३ महिला आहेत.

खरंतर, जळगावच्या पुढे पाचोरा स्टेशनजवळ लखनऊहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची बातमी पसरली. ही माहिती मिळताच, ट्रेनची साखळी ओढण्यात आली आणि ट्रेन थांबताच, प्रवासी घाईघाईने खाली उतरू लागले. त्यावेळी दुसऱ्या बाजूने कर्नाटक एक्सप्रेस जात होती आणि अनेक प्रवाशांना तिचा फटका बसला. ट्रेनला ब्रेक लावण्याचीही संधी मिळाली नाही, त्याआधी अनेकांचा जीव गेला.

या संदर्भात मध्य रेल्वेचे सीपीआरओ डॉ. स्वप्नील नीला म्हणाले, “पुष्पक एक्सप्रेसमध्ये चेन पुलिंगची घटना घडली. या घटनेनंतर काही प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूने येणारी कर्नाटक एक्सप्रेस तिथून भरधाव गेल्याने काही लोक ट्रेन चिरडल्या गेले. या भीषण दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरू आहेत.

Terrible train accident in Jalgaon

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात