विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी – थंडीमुळे हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामुळे मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या मोहोराला अवकाळी पावसाचा फटका बसला होता. मात्र काही ठिकाणी वाचलेल्या मोहरावरील फळे सुपारीच्या आकाराची व थोडी मोठी झाली आहेत.Mango due to frost Consolation to the gardeners
थंडीचे सातत्य कायम असल्याने मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोहोरामुळे फळधारणा झाली असून त्याचे प्रमाण २५ टक्के आहे. या मोहोराला फळ धारणा होऊन आंबा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. या वर्षी गुढीपाडव्याला आंबा बाजारात आला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प असणार आहे.
https://youtu.be/7bXWzmIR_uI
यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. शिवाय ऑक्टोबर हीट ही चांगली झाल्याने नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू होताच मोहोर प्रक्रिया सुरू झाली. परंतु दिवाळीत अवकाळी पाऊस झाल्याने काही ठिकाणी मोहोर कुजला. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातातून निसटले.
पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने पालवी सुरू झाली आहे.गेले काही दिवस थंडीचे प्रमाण चांगले असल्याने मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे .काही ठिकाणी फळधारणा ही सुरू झाली आहे हा आंबा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App