२ तरुणांचे अपहरण करून गैरव्यवहार केलेल्या दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली

विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशामध्ये आणि जगामध्ये महिलांवर अत्याचार होतात. याबद्दल बोललं जातं, आवाज उठवला जातो. पण पुरुषांवर देखील बरेच अत्याचार होत असतात. त्याविषयी जास्त बातम्या मीडिया मध्ये येत नाहीत. नुकताच मुंबईमधील मालाड या भागामध्ये एक विचित्र प्रकार घडला.

Malad police have arrested two persons for abducting and abusing two youths

6 जानेवारी 2021 रोजी सहा माणसांनी मिळून 21 वर्षीय आणि 16 वर्षीय मुलांना किडनॅप केले. चोरीच्या संशयावरून त्यांनी हे किडनॅपिंग केले होते. अपहरणा नंतर सहा जणांनी मिळून त्या 2 युवकांचे केस कापले आणि त्यांना नेकेड परेड करायला लावली. आणि ह्या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मिडीयावर अपलोड केला.


लहान मुलांचे अपहरण आणि खून प्रकारणी गावित बहिणींच्या आजन्म कारावासाच्या शिक्षेबाबत महाराष्ट्र सरकारतर्फे दया नाही


जेव्हा या दोघांना सोडून देण्यात आले तेव्हा या दोघांनी काजूपाडा मालाड पोलिस स्टेशनमध्ये याविरुद्ध तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवल्यानंतर या सहा जणांपैकी चौघांना पोलिसांनी अटक केली होती. पण त्यातील दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले नव्हते. अखेर आता अकरा महिन्यांनंतर या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

राजेंद्र डुलगज वय 28 आणि अजय बीडलान वय 26 असे अटक केलेल्या दोघांचे नाव आहे. यापैकी डुलगज हा आपले लोकेशन सारखे बदलत होता त्यामुळे त्याला अटक करणे पोलिसांना इतके वेळ लागला. पण आता ह्या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Malad police have arrested two persons for abducting and abusing two youths

 

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात