विशेष प्रतिनिधी
मुंबई : वज्रमुठीतले मधले बोट ढासळत चालले आहे. अजितदादा गेले तर राष्ट्रवादीच राहणार नाही, असे सांगत राष्ट्रवादीतले आमदाराचा उघडपणे बंडाच्या पवित्र्यात आले आहेत. पण त्या पलिकडे जाऊन राष्ट्रवादीतले “सत्य” सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या तोंडून बाहेर आले आहे. सत्तेशिवाय शहाणपण नाही आणि विकास कामांसाठी सत्तेशिवाय पर्याय नाही, असे वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. माणिकरावांच्या याच वक्तव्याला पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दुजोरा दिला आहे. अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू असे वक्तव्य अण्णा बनसोडे यांनी केले आहे.Major cracks in NCP, MLAs openly support ajit Pawar’s rebellion
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार नाही. ज्यांना जायचे ते वैयक्तिक पातळीवर जातील, असे वक्तव्य शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची सिल्वर ओकवर झालेल्या भेटीत केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली होती. त्यामुळे पवारांनी राष्ट्रवादीतल्या आमदारांना वैयक्तिक पातळीवर निर्णय घेण्याची हिंट दिली, असा त्याचा अर्थ राष्ट्रवादीच्या वर्तुळात काढला गेला. त्यामुळेच अजितदादा समर्थक आमदार उघडपणे बाहेर आले आणि त्यांनी सत्तेशिवाय शहाणपण नाही, असे उघड सूचक वाक्य उच्चारून राष्ट्रवादीचे दिशा स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादीचा जो काही निर्णय होईल तो भाजपपेक्षा राष्ट्रवादीला अनुकूल ठरवा यासाठी आमदारांची धडपड आहेत. शिंदे – फडणवीस सरकार स्थिर आहे आणि ते आणखी मजबूत करण्यासाठी काँग्रेसला पूर्णपणे अलग थलग पाडण्यासाठी भाजप राष्ट्रवादी फोडण्याचा डाव रचत आहे, अशी पोलिटिकल थियरी मराठी माध्यमांनी मांडली आहे. पण त्या पलिकडची एक वस्तुस्थिती आहे, तीच आमदार माणिकराव कोकाटे यांच्या तोंडून बाहेर आली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादीला सत्तेशिवाय शहाणपण नाही. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही. मग त्यासाठी कितीही जुगाडू राजकारण करावे लागले तरी चालेल पण ते करायला पवार मागेपुढे पाहत नाहीत, हेच यातून स्पष्ट होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App