Maharashtra Curfew 2021 : ना इलेक्शन, ना कुंभमेळा; तरीही कोरोनात महाराष्ट्राचाच नंबर पहिला

maharashtra curfew 2021 No election, no Kumbh Mela, yet Maharashtra ranks first in terms of corona

Maharashtra Curfew 2021 : संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण केले आहे. गेल्या 24 तासांत देशात सर्वाधिक 2 लाखांहून जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांत कोरोनाचा संसर्ग वाढलेला असला तरी महाराष्ट्राची आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून निवडणुका सुरू असलेल्या राज्यांत कोरोनाच्या प्रसारासाठी भाजपच्या प्रचारसभांना जबाबदार ठरवले आहे. परंतु, ज्या राज्यांत कुंभमेळा नाही किंवा निवडणुकाही नाहीत, अशाही राज्यांत कोरोनाच्या संसर्गात कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. maharashtra curfew 2021 No election, no Kumbh Mela, yet Maharashtra ranks first in terms of corona


विशेष प्रतिनिधी

मुंबई : संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण केले आहे. गेल्या 24 तासांत देशात सर्वाधिक 2 लाखांहून जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांत कोरोनाचा संसर्ग वाढलेला असला तरी महाराष्ट्राची आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून निवडणुका सुरू असलेल्या राज्यांत कोरोनाच्या प्रसारासाठी भाजपच्या प्रचारसभांना जबाबदार ठरवले आहे. परंतु, ज्या राज्यांत कुंभमेळा नाही किंवा निवडणुकाही नाहीत, अशाही राज्यांत कोरोनाच्या संसर्गात कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

कोरोना संसर्गात महाराष्ट्रच अव्वल

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही देशातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत खूप जास्त आहे. राज्यात आरोग्य सेवाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या फरकाने वाढली आहे. भाजपवर सभा घेतल्याचा आरोप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांनीही विविध गर्दीच्या कार्यक्रमांना हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नुकताच एका कार्यकम्राच्या निमित्ताने गर्दी जमवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्यात कोरोनाला अटकाव घालण्यासाठी 15 दिवसांची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.

दुसरीकडे निवडणुका किंवा कुंभमेळा नसलेल्या इतर राज्यांपैकी गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, हरियाणा या राज्यांतही कोरोनामुळे मोठे संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने लस आलेली असली तरी ‘दवाई भी कडाई भी’ या मूलमंत्रासह पाच सूत्री पद्धतीचा अवलंब करण्याच्या वारंवार सूचना देऊनही सर्वच राज्यांत याचे काटेकोरपणे पालन झाले नाही, यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आता रौद्ररूप धारण केले आहे. दैनिक भास्करने दिलेल्या एका वृत्तानुसार इतर राज्यांतही कोरोनाचा संसर्ग वेगवान असल्याचे दिसून आले आहे.

गुजरात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे की, स्मशानभूमीबाहेर रांगाच रांगा लागल्या आहेत. मृतदेह जाळण्यासाठी जागा कमी पडत आहे. सुरतमध्ये तर सलग अंत्यसंस्कार सुरू असल्याने विद्युतदाहिनीची चिमणीही उष्णतेमुळे वितळल्याचे समोर आले आहे. गुजरातच्या सुरत, अहमदाबाद, राजकोट आणि बडोद्यासारख्या शहरात दररोज तब्बल 600 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. एका वृत्तानुसार, यात तब्बल 96 किलो लाकूड वापरले जात आहे.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशातही कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे उपचारांवर प्रभाव पडत आहे. गंभीर रुग्णांसाठी येथे ऑक्सिजनची कमतरता प्रामुख्याने जाणवत आहे. एकट्या इंदूरमध्ये दररोज 100 टन ऑक्सिजनची मागणी असताना केवळ 70 टन मिळत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

राजस्थान

राजस्थानातही कोरोना रुग्णसंख्या अचानक वाडलेली दिसून येत आहे. येथे एकट्या अजमेर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 26 हजारांच्या पुढे गेली आहे. प्रशासनाचा आणि स्थानिक नागरिकांचा बेजबाबदारपणा याला कारणीभूत आहे, हेच यातून स्पष्ट होते.

हरियाणा

हरियाणामध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम दिसून येत आहे. शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आलेले हे राज्य आता कोरोनाशी निकराची लढाई लढताना दिसत आहे. रोहतकमधील उदाहरण काळजीत टाकणार आहे. येथे पहिल्यांदाच एका दिवसात 8 मृत्यू झाले. कोरोनाच्या नियमावलीनुसार रुग्णवाहिकेतून चार-चार मृतदेह नेण्यात आले. जागा कमी पडल्याने दोन-दोन करून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ओढवली. चारच तासांनी चितेवर पाणी टाकून दुसऱ्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा करण्यात आली.

छत्तीसगड

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये तर अत्यंत विदारक स्थिती आहे. रायपूरच्या महादेव घाट स्मशानभूमीवर मृतदेहांवर अंत्यसंस्कारांसाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. यामुळे स्मशानघाटावरील फलटावरच अंत्यसंस्कार उरकण्यात येत आहेत. रांचीतही दररोज 20 हून जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार सुरू आहेत. परिस्थिती एवढी बिकट आहे की, येथे मृतदेह आणण्याआधीच चिता तयार करणे सुरू आहे. स्मशानघाट आणि कब्रस्तानात अंत्यविधीसाठी रांगा लागल्या आहेत. घाघरा येथील स्मशानात तर एकत्रच 22 कोरोना रुग्णांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या वरील सर्व राज्यांत ना निवडणुका सुरू आहेत, ना कुंभमेळा आहे. तरीही तेथे कोरोना संसर्गाने हाहाकार माजवल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून महाराष्ट्र शासनाने कोणताही धडा घेतला नाही. तसे झाले असते तर आज देशात चुकीच्या कारणासाठी (सर्वाधिक रुग्णसंख्या) महाराष्ट्राचा पहिला नंबर आला नसता.

maharashtra curfew 2021 No election, no Kumbh Mela, yet Maharashtra ranks first in terms of corona

महत्त्वाच्याा बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात