Corona Updates In India 2 lakh patients registered in 24 hours, active cases above 14 lakh

Corona Updates In India : देशात २४ तासांत २ लाख रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्या १४ लाखांच्या पुढे

Corona Updates In India :  कोरोनाचा संसर्गाने देशात हाहाकार उडवण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग प्रचंड असल्याचे दिसून येत आहे. जगाच्या तुलनेत दररोज सर्वांधिक रुग्णांची नोंद भारतात होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मागच्या 24 तासांत 200,739 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1038 जणांचा मृत्यू झाला आहे. Corona Updates In India 2 lakh patients registered in 24 hours, active cases above 14 lakh


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्गाने देशात हाहाकार उडवण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग प्रचंड असल्याचे दिसून येत आहे. जगाच्या तुलनेत दररोज सर्वांधिक रुग्णांची नोंद भारतात होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मागच्या 24 तासांत 200,739 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1038 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 24 तासांत कोरोनातून 95,528 जण बरे झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी 184,372 नवीन रुग्ण आढळले होते. गतवर्षीच्या 2 ऑक्टोबरनंतर काल सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाची स्थिती

एकूण कोरोना रुग्ण – 1 कोटी 40 लाख 74 हजार 564
एकूण बरे झालेले – 1 कोटी 24 लाख 29 हजार 564
एकूण सक्रिय रुग्ण – 14 लाख 71 हजार 877
एकूण मृत्यू – 1 लाख 73 हजार 123
एकूण लसीकरण – 11 कोटी 44 लाख 93 हजार 238 डोस देण्यात आले

महाराष्ट्रात 15 दिवस संचारबंदी

बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 58,952 नवीन रुग्ण नोंदवण्यात आले. तर 278 जणांचा मृत्यू झाला. वेगाने होणारी वाढ आणि चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण राज्यात 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवसांची राज्यव्यापी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 35,78,160 पर्यंत वाढली आहे, तर आतापर्यंत एकूण 58,952 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

काल देशभरात एकूण 33 लाख लसीकरण

कोरोना लस देण्याची मोहीम 16 जानेवारीपासून देशात सुरू झाली. 14 एप्रिलपर्यंत देशभरात 11 कोटी 44 लाख 93 हजार 238 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल 33 लाख 13 हजार 848 लसीचे डोस देण्यात आले. लसीचा दुसरा डोस देण्याची मोहीम 13 फेब्रुवारीपासून सुरू झाली. 1 एप्रिलपासून, 45 वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्यात येत आहे.

देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 1.24 टक्के आहे, तर बरे होण्याचा दर 89 टक्के आहे. सक्रिय रुग्णांचा दर 10 पर्यंत वाढला आहे. कोरोना सक्रिय रुग्णांमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे. तर एकूण रुग्णांच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे.

Corona Updates In India 2 lakh patients registered in 24 hours, active cases above 14 lakh

महत्त्वाच्याा बातम्या