Maharashtra Curfew 2021 : मुंबईत ‘ब्रेक द चेन’चा फज्जा, रात्री अंधेरी स्थानकावर गर्दीच गर्दी

Maharashtra Curfew 2021 crowd seen at Andheri station at night

प्रचंड वेगाने वाढणाऱ्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात पुढचे पंधरा दिवस कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बुधवारी रात्रीपासून अमलात आलेल्या या संचारबंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. Maharashtra Curfew 2021 crowd seen at Andheri station at night


विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रचंड वेगाने वाढणाऱ्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात पुढचे पंधरा दिवस कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बुधवारी रात्रीपासून अमलात आलेल्या या संचारबंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

लॉकडाउनसदृश निर्बंध रात्री आठ वाजेपासून प्रभावात आले, हे निर्बंध एक मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. परंतु, सरकारच्या या ‘ब्रेक द चेन’ मोहिमेचा काही जणांवर प्रभाव पडताना दिसत नाही. निर्बंध असूनही लोकं मनमानी पद्धतीने वागताना दिसत आहेत.

महाराष्ट्रात बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाउनसारखे निर्बंध लागू झाले, तरीही अंधेरी स्थानकाबाहेर रात्री साडेआठच्या सुमारास प्रचंड गर्दी दिसून आली. लोक कोरोनाबाबत बेफिकीर राहिलेले दिसून आले.

महाराष्ट्रात कोरोनाचे 58,952 नवीन रुग्ण

दुसरीकडे, राज्यात दररोज 50 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. बुधवारी, कोरोनाचे 58,952 नवीन रुग्ण नोंदवले गेले, तर 278 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण मृतांची संख्या 58,804 वर गेली आहे.

Maharashtra Curfew 2021 crowd seen at Andheri station at night

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण