maharashtra curfew 2021 : मुंबईत रुग्णालये जवळपास फुल्ल, आता ५ स्टार हॉटेल्समध्ये होणार रुग्णांवर उपचार

maharashtra curfew 2021 Hospitals nearly full in Mumbai, now 5 star hotels to treat corona patients

maharashtra curfew 2021 : गुरुवारी देशभरात कोरोनाचे तब्बल दोन लाखांहून जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. दरम्यान, आता रुग्णालयांत जागा अपुरी पडू लागल्याने मुंबईत पंचतारांकित हॉटेल्समध्ये कोरोना रुग्णांसाठी बेडची सोय करण्यात येणार आहे. बीएमसीने गुरुवारी सांगितले की, सध्या खासगी रुग्णालयांना दोन पंचतारांकित हॉटेल्स वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या दोन हॉटेलमध्ये 42 बेड उपलब्ध होतील. maharashtra curfew 2021 Hospitals nearly full in Mumbai, now 5 star hotels to treat corona patients


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गुरुवारी देशभरात कोरोनाचे तब्बल दोन लाखांहून जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. दरम्यान, आता रुग्णालयांत जागा अपुरी पडू लागल्याने मुंबईत पंचतारांकित हॉटेल्समध्ये कोरोना रुग्णांसाठी बेडची सोय करण्यात येणार आहे. बीएमसीने गुरुवारी सांगितले की, सध्या खासगी रुग्णालयांना दोन पंचतारांकित हॉटेल्स वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या दोन हॉटेलमध्ये 42 बेड उपलब्ध होतील.

बीएमसी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांत यात आणखी हॉटेल्सही समाविष्ट केली जातील. या ठिकाणी गंभीर लक्षणे नसलेल्या कोरोना रूग्णांवर उपचार केले जातील. याव्यतिरिक्त येत्या आठवड्यात बीएमसीची 2000 बेड वाढवण्याची योजना आहे. यातील काही आयसीयू बेड असतील, तर काही ऑक्सिजन बेड असतील. मुंबईतील रुग्णालयात 98 टक्के आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड भरले आहेत.

बीएमसीने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, रुग्णालये रुग्णांकडून दिवसाचे 4000 रुपये शुल्क घेऊ शकतात. यामध्ये बेड्स आणि फूड चार्जचा समावेश असेल. रुग्णाच्या उपचाराचा खर्च स्वतंत्रपणे भरावा लागेल. एकाच कुटुंबातील दोन जण भरती झाले, तर ट्वीन शेअरिंगचा पर्याय आहे. यासाठी एका दिवसाचे 6 हजार रुपये शुल्क आकारले जातील.

तत्पूर्वी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख इक्बालसिंग चहल यांनी सोमवारी म्हटले होते की, सरकारने सीसीसी 2 सुविधा (रुग्णांसाठी कोविड -19 केअर सेंटर) सुरू करण्यासाठी 4 आणि 5 स्टार हॉटेल्सना विनंती केली होती. ही केंद्रे मोठ्या खासगी रुग्णालयांच्या देखरेखीखाली चालविली जातील.

महत्त्वाच्याा बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात