निवडणुकांच्या पाच राज्यांत कोरोना पसरतोय वेगाने; प्रचारसभा ठरताहेत सुपर स्प्रेडर.. संसर्ग व मृत्यूदरांमध्ये मोठी वाढ

Election campaigning Triggers Corona in 5 States Aasam, West Bengal, Tamilnadu, Kerala, Puducherry

Election campaigning Triggers Corona : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात भयंकर रूप धारण केल्याचे दिसून येत आहे. मागच्या 24 तासांत देशभरात 2 लाखांहून जास्त रुग्ण आढळले आहेत. ज्या पाच राज्यांत निवडणुका सुरू आहेत, तेथेही कोरोनाच्या संसर्गाने वेग धरलेला दिसून येत आहे. राजकीय पक्षांच्या प्रचार सभाच येथे सुपर स्प्रेडर ठरल्याचे दिसून आले आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी येथील कोरोनाच्या संसर्गात आणि मृत्युदरामध्ये मोठी वाढ झाली आहे. Election campaigning Triggers Corona in 5 States Aasam, West Bengal, Tamilnadu, Kerala, Puducherry


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात भयंकर रूप धारण केल्याचे दिसून येत आहे. मागच्या 24 तासांत देशभरात 2 लाखांहून जास्त रुग्ण आढळले आहेत. ज्या पाच राज्यांत निवडणुका सुरू आहेत, तेथेही कोरोनाच्या संसर्गाने वेग धरलेला दिसून येत आहे. राजकीय पक्षांच्या प्रचार सभाच येथे सुपर स्प्रेडर ठरल्याचे दिसून आले आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी येथील कोरोनाच्या संसर्गात आणि मृत्युदरामध्ये मोठी वाढ झाली आहे.

‘दैनिक भास्कर‘ने दिलेल्या वृत्तानुसार मागच्या पाच दिवसांत या 5 राज्यांमध्ये कोरोना संसर्गात 169% आणि मृत्यूंमध्ये 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही आकडेवारी पाहूनच येथील भयावह परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. निवडणुकीच्या प्रचारसभा सुपरस्प्रेडर ठरल्याचे यावरून स्पष्ट होईल. कोणत्या राज्यात काय परिस्थिती आहे यावर एक नजर टाकूया…

हेही वाचा… Maharashtra Curfew 2021 : ना इलेक्शन ना कुंभमेळा, तरीही कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्राचाच पहिला नंबर

1. आसाम

आसाममधील कोरोनाची आकडेवारी धक्कादायक आहे. येथे 16 ते 31 मार्चदरम्यान केवळ 537 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. याचाच अर्थ तेव्हा तेथील परिस्थिती बरीच नियंत्रणात होती. परंतु आता 1 ते 14 एप्रिलदरम्यानची आकडेवारी धडकी भरायला लावणारी आहे. या 14 दिवसांत 3398 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, यादृष्टीने येथे 532 टक्के वेगाने कोरोना वाढल्याचे दिसून येते. मृत्यूच्या बाबतीतही असेच आहे. मार्चमध्ये येथे 6 जणांनी आपला जीव गमावला, तर या 14 दिवसांत आतापर्यंत 15 मृत्यूंची नोंद झाली आहे.

2. पश्चिम बंगाल

मार्चमध्ये येथे 8 हजार रुग्ण आढळले होते, परंतु आता 41 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. निवडणुकांमुळे पश्चिम बंगाल आधीपासूनच चर्चेत आहे. पंतप्रधानांपासून ममता बॅनर्जीपर्यंत देशातील अनेक बड्या नेत्यांनी बंगालमध्ये अनेक ठिकाणी रोड शो, प्रचार सभा घेतल्या आहेत. या सभांनी गर्दीचे विक्रम मोडले. या सभादरम्यान बहुतांश लोकांनी मास्क घातलेले नव्हते. याचा परिणाम आता बंगालात दिसून येत आहे. बंगालमध्ये मागच्या 14 दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या 420 टक्क्यांनी वाढली आहे. 1 ते 14 एप्रिलदरम्यान येथे 41 हजार 927 रुग्ण आढळले आहेत. यात अनेक मृत्यूही झाले आहेत.

3. केरळ

मार्चमध्ये येथे 30 हजार रुग्ण होते, परंतु आता 61 हजारांहून अधिक रुग्ण आहेत. याचा अर्थ आधीच येथे कोरोनाने जनता त्रस्त होती, निवडणुकांतील प्रचार सभांनी यात आणखी भर घातली. देशभरात संसर्गाचे प्रमाण जेव्हा कमी होत होते, तेव्हा येथे वेगाने वाढ होऊ लागली होती. मध्येच थोडासा दिलासा मिळाला, पण निवडणुकीमुळे पुन्हा येथे मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरला. राजकीय पक्षांच्या सभा, रोड शो आणि मेळावे यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे.

4. तामिळनाडू

मार्च महिन्यात राज्यात 25 हजारांच्या आसपास असणारी रुग्णसंख्या आता 65 हजारांच्या पुढे गेली आहे. राज्यातील संसर्गाचे प्रमाण 159 टक्क्यांनी वाढले आहे. त्याचप्रमाणे मृत्यूच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मार्चमध्ये 163 मृत्यू झाले. परंतु मागच्या 14 दिवसांत 232 जणांनी येथे आपला जीव गमावला आहे.

5. पुडुचेरी

एप्रिलच्या 14 दिवसांत 3 हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. देशात जेव्हा कोरोनाचा सर्वात मोठा उद्रेक होता, तेव्हाही पुडुचेरीत फारशी गंभीर स्थिती नव्हती. नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत दिवसाकाठी फारतर 50 रुग्ण आढळायचे. परंतु आता परिस्थिती चिघळत चालली आहे. आता दररोज 400 ते 500 कोरोनाबाधित आढळत आहेत. कोरोनाच्या नव्या प्रकरणांत 165 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. येथे 16 ते 31 मार्चपर्यंत 1400 जणांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला होता. 1 ते 14 एप्रिलदरम्यान 3,721 कोरोनाबाधित आढळले आहेत. याचप्रकारे मृत्यूच्या बाबतीतही वाढ झाली आहे. मार्चमध्ये येथे संसर्गामुळे 9 जणांचा मृत्यू झाला होता, ही संख्या वाढून 15 झाली आहे.

Election campaigning Triggers Corona in 5 States Aasam, West Bengal, Tamilnadu, Kerala, Puducherry

महत्त्वाच्याा बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण