जाणून घ्या, कोणाला कुठून मिळाले तिकीट
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेच्या आठ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून धैर्यशील माने, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलढाणामधून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेतून संजय मंडलिक आणि मावळमधून श्रीरंग आप्पा बारणे यांना तिकीट देण्यात आले आहे. कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या उमेदवारांची अदलाबदल झाली असून, रामटेक लोकसभा मतदारसंघातून कृपाल यांच्या जागी राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.Loksabha Election 2024: Eknath Shinde announced the list of eight candidates of Shiv Sena
दरम्यान, बॉलीवूड अभिनेता गोविंदाने आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत पुन्हा राजकारणातील आपल्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात केली आहे. अभिनेता गोविंदाने 14 वर्षांच्या अंतराने पुन्हा राजकारणात प्रवेश केला. त्याने एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला.
शिवसेना आता त्याला वायव्य मुंबईतून उमेदवारी देऊन अमोल कीर्तीकरण विरोधात रणमैदानात उतरवण्याची तयारी करत आहे. त्यामुळे गोविंदाला परत एकदा 2004 चा राजकीय चमत्कार करण्याची संधी आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App