विशेष प्रतिनिधी
मुंबई : जोपर्यंत मुंबईसह लगतच्या उपनगरांमध्ये ७० टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत लोकल प्रवास खुला होणार नसल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.Local train not for common peopels
गत तीन महिन्यांपासून लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. रोजगाराची चिंता, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दैनंदिन खर्चासह वाढलेला प्रवास खर्च सांभाळताना सर्वसामान्यांची तारेवरची कसरत होत आहे.
पेट्रोलनेही शंभरी गाठल्याने खासगी वाहने वापरणे गैरसोयीचे झाले आहे. परिणामी, लोकल प्रवास खुला करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, ६० ते ७० टक्के लसीकरण झाल्यानंतरच लोकल सेवा सुरू केली जाईल, असे शेख यांनी स्पष्ट केले आहे.
यापूर्वी मे महिन्यात ५० टक्के लसीकरण झाल्याशिवाय लोकल सेवा सुरू करणे शक्य नाही, असे शेख म्हणाले होते. त्यानंतर आता ६० ते ७० टक्के लसीकरणाची अट शेख यांनी जाहीर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App