लोकल बंदीमुळे हैराण मुंबईकरांच्या संतापाला राज ठाकरे यांनी फोडली वाचा, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आता सहन करण्याची क्षमता संपत चालली


विशेष प्रतिनिधी

मुंबई: सर्वसामान्यांनी आतापर्यंत खूप सहन केले. आता सहन करण्याची क्षमता संपत चालली आहे, असा इशारा देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईकरांच्या संतापाला वाचा फोडली आहे. करोना लॉकडाउन विशेषत: लोकल बंदीमुळं हैराण झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे कळविल्या आहेत.Raj Thackeray broke the anger of Mumbaikars who were harassed due to local ban letter written by Raj Thackeray to the Chief Minister Uddhav Thackeray.

राज ठाकरे यांचं पत्र त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर करण्यात आलं आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालयं सुरू आहेत. सर्वांना घरून काम करता येणं शक्य नसल्यानं त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागत आहे. लोकांचे अतोनात हाल होत आहेत. बस सेवेला परवानगी दिली असली तरी लोकल बंद असल्यामुळं बसमध्ये प्रचंड गर्दी होतेय.



अशा गर्दीत रोग पसरण्याचा धोका अधिक आहे. मुंबईतील लोकल सेवा तातडीनं सुरू करण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला हवीत. लोकांनी आतापर्यंत खूप सहन केलंय आता सहन करण्याची क्षमता संपत चालली आहे. यापुढं सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल.

त्या परिस्थितीत मनसे मुंबईकरांसोबत उभी राहील आणि लोकल सुरू करण्यासाठी आंदोलन करेल. मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी तातडीनं सुरू करा.

ही साथ एकाएकी जाणार नाही हे गृहित धरून आता सरकारनं उपाययोजना व धोरणा आखण्याची गरज आहे. लसीकरणाचा वेग वाढवतानाच धोरण आखण्यात अधिक कल्पकता असणं गरजेचं आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारला टाळेबंदी आणि निबंर्धांच्या पलीकडचा विचार करावा लागेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray broke the anger of Mumbaikars who were harassed due to local ban letter written by Raj Thackeray to the Chief Minister Uddhav Thackeray.

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात