केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचे गिफ्ट, DA 11% वाढून 28% केला, जाणून घ्या सॅलरी आणि पेन्शनमध्ये किती होणार वाढ

Seventh Pay Commission Modi Cabinet Approves Central Government Employee DA Hike by 11 percent

Central Government Employee DA Hike : कोरोना महामारीदरम्यान केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा देतानाच महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून वाढून 28 टक्के झाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कॅबिनेट ब्रीफिंगदरम्यान बुधवारी म्हटले की, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि वेतन मिळणाऱ्यांना महागाई भत्ता 28 टक्के करण्यात आला आहे. हा निर्णय 1 जुलै 2021 पासून लागू होईल. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तब्बल 48 लाख कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख निवृत्तिवेतन धारकांना फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 34400 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. Seventh Pay Commission Modi Cabinet Approves Central Government Employee DA Hike by 11 percent


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीदरम्यान केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा देतानाच महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून वाढून 28 टक्के झाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कॅबिनेट ब्रीफिंगदरम्यान बुधवारी म्हटले की, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि वेतन मिळणाऱ्यांना महागाई भत्ता 28 टक्के करण्यात आला आहे. हा निर्णय 1 जुलै 2021 पासून लागू होईल. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तब्बल 48 लाख कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख निवृत्तिवेतन धारकांना फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 34400 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

मोदी सरकारतर्फे हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा गतवर्षी या निर्णयावर स्थगिती आणण्यात आली होती. केंद्र सरकारकडून आधी 1 जानेवारी 2020 पर्यंत डीएला रोखण्यात आले होते आणि नंतर तो वाढवून 1 जुलै 2021 पर्यंत रोखण्यात आला. केंद्र सरकारकडून रोखण्याचा निर्णय कोरोना महामारीच्या दरम्यान सरकारच्या घटत असलेल्या महसूल आणि कल्याणकारी योजनांवरील वाढत असलेल्या खर्चामुळे घेण्यात आला होता.

महागाई भत्त्यावर तीन हप्ते प्रलंबित आहेत, 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2020 पर्यंत- 4 टक्के, यानंतर 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यत- 3 टक्के आणि 1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 पर्यंत- 4 टक्के. महागाई भत्त्यावरील स्थगिती उठल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना टेक-होम सॅलरी, प्रोव्हिडेंट फंड काँट्रिब्यूशन आणि ग्रॅच्युइटीमध्ये मोठी वाढ पाहायला मिळू शकते.

किती वाढणार पगार?

महागाई भत्त्यावरील स्थगिती उठल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होऊ शकते हे जाणून घेऊया. सातव्या वेतन आयोगानुसार, लेव्हल-1 कर्मचारी वा मिनिमम ग्रेड पे 1,800 आणि त्याची बेसिक सॅलरी 18,000 पासून ते 56,900 दरम्यान आहे. याच एंट्री लेव्हल कर्मचाऱ्यांना ज्यांची बेसिक सॅलरी 18 हजार आहे, त्यांच्या प्रोव्हिडेंट फंड आणि टॅक्समध्ये कपातीपूर्वी टेक-होम सॅलरीमध्ये 1,980 रुपयांची वाढ होईल.

तथापि, अद्याप हे स्पष्ट नाहीये की, 1 जानेवारी 2020 पासून थकीत महागाई भत्ता सरकार कधी देणार आहे. थकीत रक्कम दिल्याने तिजोरीवर मोठा परिणाम होईल. उदाहरणासाठी लेव्हल-1 च्या कर्मचाऱ्याचा कमीत कमी बाकी 23,760 (18,000 रुपये सहा महिन्यांसाठी 4 टक्क्यांसह, 18 हजारांचे सहा महिन्यांसाठी 7 टक्क्यांसह आणि 18 हजारांचे सहा महिन्यांसाठी 11 टक्क्यांसह). अशा प्रकारे, आपण जर सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांची बाकी जोडली तर सरकारसाठी ही मोठी रक्कम ठरते.

Seventh Pay Commission Modi Cabinet Approves Central Government Employee DA Hike by 11 percent

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात