विशेष प्रतिनिधी
लंडन : संयुक्त राष्ट्रांनी तापमानवाढ दोन अंशांपर्यंतच रोखण्याचे उद्दीष्ट्य जगासमोर ठेवले असताना संशोधकांनी तीन हून अधिक अंशांची तपामनावाढ होण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पर्यावरण बदलाचा वेगही वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.Global warming is risen in world
ब्रिटनमधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. तापमानवाढीत ढगांमुळे होणारा परिणाम महत्त्वाचा ठरणार असल्याचे इम्पेरिकल कॉलेजच्या संशोधकांनी म्हटले आहे.
संशोधकांनी पृथ्वीच्या वातावरणातील ढगांच्या आच्छादनाचा अभ्यास केला. यानुसार, औद्योगिकीकरणपूर्व काळाच्या तुलनेत सध्या हवेतील कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण दुप्पट असल्याने तापमानवाढ दोन अंशांपर्यंत रोखणे अवघड आहे. उलट सरासरी तापमानवाढ ३ अंशाच्याही वर जाईल.
औद्योगिकीकरणपूर्व काळाच्या तुलनेत कार्बन वायूचे प्रमाण दुप्पट झाल्याने होणारी तापमानवाढ ही ‘पर्यावरण संवेदनशील’ समजली जाते. या मापदंडानुसार पर्यावरण बदलांचा आढावा घेतला जातो. हा अंदाज घेताना सर्वाधिक अनिश्चिणतता ढगांमुळे होणाऱ्या परिणामांची असते.
भविष्यात ढगांचे प्रमाण कसे बदलते, त्यावर तापमानवाढ अवलंबून असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. ढगांची घनता, वातावरणात ते किती उंचावर आहेत, यावर तापमानवाढीवर त्यांचा परिणाम कमी-अधिक असेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App