कार्बन उत्सर्जन कपातीचे तंत्रज्ञान विकसित केल्यास ७३० कोटीचे बक्षीस ; टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांची घोषणा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार असलेले कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्याला सुमारे ७३० कोटीचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी केली. donating $100M towards a prize for best carbon capture technology


जगातील सर्वाधिक श्रीमंत एलॉन मस्क यांची गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राऐवजी बंगळुरूला पसंती


टेस्ला कंपनी ही जगातील सर्वात मोठी ईलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी आहे. कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन ही जगासाठी डोकेदुखी बनली आहे. ते कमी करणाऱ्या कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी जो विकसित करेल, त्याला हे बक्षीस दिले जाईल, असे ट्विट त्यांनी गुरुवारी केले आहे. या बाबतची अधिक माहिती नंतर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

एलन मस्क कोण आहेत ?

  •  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव आहे.
  •  टेस्ला कंपनीने निकतेच भारतात पदार्पण केले असून कर्नाटकाची राजधानी बंगळुरू येथे कार्यालय थाटले आहे. अगोदर ते मुंबईत थाटण्याची योजना होती.
  •  जगामध्ये विविध भव्यदिव्य वैज्ञानिक प्रकल्प राबविण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे. ते आकारास आले तर मानवी बुद्धीचा विकास आणखी किती होईल, याचा विचार करायची वेळ येईल.
  •  जगात ईलेक्ट्रिक कारचे युग आणणे, मंगळावर मानवी वसाहत निर्माण करणे, जगभरात हायपरलूप प्रकल्प राबविणे (उदा. पुणे-मुंबई हा 150 किलोमीटरचा प्रवास केवळ 25 मिनिटात होईल.)
  •  मानवी जीवन विज्ञानाच्या सहाय्याने अधिक सुखमय करण्याचे त्यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे ठरले आहेत.

donating $100M towards a prize for best carbon capture technology

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था