नवज्योतसिंग सिद्धूंविरुद्धची बंडाची तलवार कॅप्टन अमरिंदर यांच्याकडून अखेर म्यान

विशेष प्रतिनिधी

चंडीगड – पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू पदभार स्वीकारताना उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांनी एक पाउल मागे घेतल्याचे मानले जात आहे.Amarindar will take U turn

सिद्धू आणि चार कार्यकारी अध्यक्ष उद्या औपचारिकरीत्या पदभार स्वीकारतील. सिद्धूंच्या नेतृत्वाखाली नव्या संघातील काही जणांची अमरिंदर यांनी भेट घेतली. त्यावेळी स्वतः सिद्धू मात्र उपस्थित नव्हते.



सिद्धू यांनी ट्विटद्वारे जाहीर टीका केल्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी भूमिका अमरिंदर यांनी घेतली होती, मात्र आता नव्या प्रदेशाध्यक्षांशी जुळवून घेण्याचे त्यांनी ठरविल्याचे दिसते.

अमरिंदर यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. त्यानुसार सकाळी दहा वाजता अमरिंदर यांनी पंजाब भवनमध्ये पक्षाचे सर्व आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेते तसेच पदाधिकाऱ्यांना चहापानासाठी आमंत्रित केले आहे. तेथून सर्व जण पक्ष कार्यालयात सिद्धू यांच्या कार्यक्रमासाठी जातील.

Amarindar will take U turn

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात