काही कर्मचारी हे विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे महामडंळाने निलबंनात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली.Latur: ST carrier finally withdraws suspension of female employee
विशेष प्रतिनिधी
लातूर : एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी मागील एक महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे.दरम्यान परिवहन मंडळाने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करून संप मागे घेण्यास सांगितले होते.परंतु काही कर्मचारी हे विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
त्यामुळे महामडंळाने निलबंनात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली.याच निलंबनाच्या प्रक्रियेमध्ये एसटीदरम्यान महामंडळाने प्रसूती रजेवर असलेल्या महिला कंडक्टर सारिका कोद्रे-लाड यांचं निलंबन केलं.
गैरशिस्तपणाचा ठपका ठेवत एसटी महामंडळाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. दरम्यान महिला कंडक्टरचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे.सारिका कोद्रे-लाड यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई ही नजरचुकीने करण्यात आली होती, असं स्पष्टीकरण हे महामंडळाने दिलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App