विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने लाडकी बहीण Ladki Bahin Yojana योजना सुरू केली. तिला महाराष्ट्रातील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी 1500 रुपये देण्यात येणार आहेत. येत्या 17 तारखेला महिलांना रक्षाबंधनाची भेट म्हणून दोन हप्ते एकदम दिले जाणार आहेत. मात्र, या योजनेचे आजच पैसे देण्यास सुरुवात केली. काही महिलांच्या खात्यात हे पैसे जमाही झाले. पण मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. मात्र, मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे का दिले जात आहेत??, याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. Ladki Bahin Yojana First payment in bank
लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. सध्या चेकींग सुरू आहे. त्यामुळे मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले आहेत. 17 तारखेला पैसे ट्रान्स्फर करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून आम्ही खबरदारी घेत आहोत. उद्या 17 तारखेला तांत्रिक अडचणीमुळे खात्यात पैसे गेले नाही तर तुम्हीच बोंब माराल. त्यामुळे आम्ही आजच हे पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. ही ट्रायल रन सुरू असल्याने मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
जे बोलतो ते करून दाखवतो
आम्ही म्हणत होतो पैसे खात्यात येणार. त्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सावत्र भावांपासून सावध राहा. त्यांना ही योजना बंद करायची आहे. त्यासाठी ते कोर्टात गेले होते. कोर्टाने त्यांना फटकारलं. त्यांचा अर्ज फेटाळून लावला. आमचं सरकार देणारं आहे. करणारं आहे. आम्ही जे बोलतो तेच करतो. आम्ही पैसे परत घेणारे नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
Thailand : …म्हणून कोर्टाने थायलंडच्या पंतप्रधानांची केली हकालपट्टी!
अन् फटाके फुटले…
लाडकी बहीण योजने अंतर्गत आजपासून पैसे देण्यास सुरुवात झाली आहे. वरळी येथील एका महिलेच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथेही एका महिलेच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येलाच ही भेट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेचे पैसे खात्यात जमा होताच कणकवलीत फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला आहे.
ठाकरेंच्या मतदारसंघातूनच सुरुवात
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याची सुरुवात आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातूनच करण्यात आली आहे. वरळी मतदारसंघावर महायुतीचं प्रचंड लक्ष आहे. या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी महायुतीने चांगलीच फिल्डिंग लावली आहे. त्यातच आता लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वरळीत दिला गेल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App