विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका केव्हा होणार याचा फक्त अंदाज बांधला जात आहे. पण महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार पायउतार होऊन शिवसेना – भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांना कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत मध्ये ताकद अजमावणीची संधी मिळाली आहे. महापालिका निवडणुकांपूर्वीची ही ताकद अजमावणी असेल. त्यामुळेच सर्व पक्षांचे इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. Kasba and chinchwad Byelection, litmus test for all political parties
आजवर पोटनिवडणुकीत विद्यमान दिवंगत आमदाराच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देऊन ती जागा बिनविरोध निवडणूक देण्याचा प्रघात होता, परंतु आता हा प्रघात मागे पडला आहे. आता पोटनिवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार उतरवला जातो आणि चुरशीच्या लढती महाराष्ट्राने पहिल्या आहेत, अशीच चुरशीची लढत नुकतेच जाहीर झालेल्या कसबा आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारीचा दावा ठोकला आणि उमेदवारी मिळाली नाही तर निदान महापालिका निवडणुकांमध्ये नगरसेवक पदाची उमेदवारी तरी निश्चित होईल या आशेने अनेक उमेदवार विधानसभा पोट निवडणुकीत उमेदवारीचा दावा ठोकत आहेत.
कसबा आणि चिंचवड मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली, त्याच्या काही तासांतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इच्छूक आहेत, असे म्हटले होते, तेव्हाच ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे निश्चित झाले होते. त्यामुळे हा निवडणूक लढवायची असेल तर महाविकास आघाडीमधून कोणत्या पक्षाने ही निवडणूक लढवायची यावर चर्चा झाली नसतानाच अजित पवार यांचे हे वक्तव्य बरेच काही सांगून गेले.
ठाकरे गटाचाही दावा
त्यात कसबा विधानसभेची जागा महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली आहे. दोन दिवसात सचिन आहिर आणि संजय राऊत यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यात यासंदर्भात निर्णय होणार आहे. त्यानुसार पक्षाची भूमिका स्पष्ट होणार आहे. मात्र ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली तर कसब्यात शिवसेनेला फायदा होईल, असेही ते म्हणाले. शिवाय शिंदे गटाविरोधात असलेल्या रागाचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो याचा विचार करावा, असाही सल्ला त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे.
भाजपांतर्गतही इच्छुक
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होईल ही आशाही धूसर होत चालली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गट आणि आप पक्षाने निवडणुकीसाठी तयारी दर्शवली आहे. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू, शंकर जगताप यांच्या नावाची चर्चा आहे. असे असताना भाजपामधून चंद्रकांत नखाते हे पोटनिवडणुकीसाठी इच्छुक आहेत. दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी आमदारकीला शोभणारी तुमची कामे आहेत, असे कौतुक जगताप हे नखाते यांचे नेहमी करायचे अशी आठवण चंद्रकांत नखाते यांनी सांगितली. लक्ष्मण जगताप यांचे ते स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी इच्छुक असल्याचे नखाते यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App