अंदमानच्या पवित्र भूमीचा कण – कण आता देशभक्तांच्या नावांनी समर्पित!!; कसा ते वाचा!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अंदमान निकोबार ही भारतीय देशभक्तांसाठी छळ छावणी होती. पण तिचे रूपांतर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जीवन समर्पित करणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यवीरांनी आपल्या तपस्या भूमीत केले. वीर सावरकरांपासून अनेक वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवनाचा क्षण अन् क्षण आणि कण अन् कण त्यासाठी झिजवला. पण त्या भूमीला बराच काळ विशिष्ट विचारांच्या सरकारांनी उपेक्षित ठेवले. पण काळ बदलला भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जीवन समर्पित करणाऱ्या आणि भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणाऱ्या असंख्य वीरांना ललामभूत ठरलेल्या अंदमान निकोबारच्या भूमीचा प्रत्येक कण आज वीरांच्या नावांनी समर्पित आहे. Andaman islands now humbly dedicated to all great Patriots of Indian freedom movement

अंदमानच्या भूमीवर तुम्ही पाय ठेवता, तोच मुळी वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर. अटलजींच्या सरकारने अंदमानच्या विमानतळाचे रूपांतर आंतरराष्ट्रीय स्वरूपात केले आणि त्याचे नामकरण वीर सावरकरांच्या नावाने केले. सावरकरांना सरकारने अंदमानच्या भूमीवर दिलेली ही पहिली मानवंदना. अंदमानच्या भूमीवर सेल्युलर जेलमध्ये सावरकर कोठडी आहे. तिथे जाऊन सावरकरांना वंदन करणे आणि स्मरण करणे हे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सावरकरांची कोठडी ही देवाचा गाभारा आहे, अशा उत्कट भावनेने पंतप्रधान मोदी सावरकरांच्या फोटोसमोर ध्यानस्थ बसले होते. सावरकरांना वाहिलेली ही उच्च आदरांजली होती.

अंदमानात वीर सावरकर पार्क आहे. तेथे अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये कष्ट भोगणाऱ्या अनेक वीरांचे पुतळे आहेत. बाबा भानसिंग, बाबा पृथ्वी सिंह आझाद क्रांतिवीरांच्या पुतळ्यांना आपण तेथे नमन करू शकतो. याच भूमीवर विधान परिषदेचे माजी सभापती जयंतराव टिळक यांनी सावरकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने 1983 मध्ये अंदमान आणि अन्यत्र कष्ट भोगलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या वंशजांचा एक मेळावा भरवला होता. यामध्ये चाफेकर बंधूंच्या वंशजांपासून भगतसिंहांच्या वंशजांपर्यंत सर्वांचा समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुभाष बाबूंच्या संकल्पनेतील शहीद आणि स्वराज दीपांचे पुनरुज्जीवन केले आहे. नेताजी सुभाष बाबूंच्या हस्ते जिथे भारताचा तिरंगा फडकवून भारतीय स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली, तेथे आज उत्तुंग तिरंगा डौलाने फडकत आहे. सुभाष द्वीपावर आता सुभाष बाबू आणि आझाद हिंद फौज यांचे भव्य स्मारक साकारणार आहे.

अंदमान निकोबारच्या 21 अनाम द्वीपांना केंद्रातल्या मोदी सरकारने 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावे देऊन त्यांचा सन्मान केला आहे. याचा अर्थच अंदमानच्या भूमीचा प्रत्येक कण आज देश वीरांच्या नावाने सन्मानित आहे. तिथे एकही भूमी देश वीरांच्या नावाशिवाय सुटलेली नाही. अंदमानची भूमी देशवासीयांसाठी तीर्थस्थान होते आणि आहेच. पण ते आता देशवीरांच्या नावाने सजले आहे!! याला जगाच्या इतिहासात तोड सापडणारे दुसरे उदाहरण नाही.

Andaman islands now humbly dedicated to all great Patriots of Indian freedom movement

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात