प्रतिनिधी
मुंबई : लडाखच्या पर्यावरणीय दुर्गतीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी समाजसुधारक सोनम वांगचूक 26 जानेवारीपासून पाच दिवस उपोषण करणार आहेत. ते उणे 40 अंश तापमान असलेल्या खार्दुंगला येथे उपोषण करतील. त्यांनी याला ‘क्लायमेट फास्ट’ म्हटले आहे. Sonam Wangchuk appeals to the Prime Minister to save the rare environment of Ladakh
संरक्षणात्मक पावले न उचलल्यास लेह- लडाखमधील दोन तृतीयांश हिमनद्या नष्ट होतील, असे काश्मीर विद्यापीठ व इतर संस्थांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर सोनम यांनी पंतप्रधानांना लडाख वाचवण्याची हाक घातली आहे.
त्वरित लडाखच्या समस्यांवर लक्ष द्या
लडाख व इतर हिमालयीन प्रदेशांना औद्योगिक शोषणापासून वाचवा. कारण, याचा येथील लोकांच्या जीवनावर परिणाम होईल. याकडे तुमचे लक्ष वेधण्यासाठी मी उपोषण करत आहे. यातून जीवंत राहिलो तर तुम्हाला पुन्हा भेटेन, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे लडाखबाबत त्वरेने पावले उचलण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more