प्रतिनिधी
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत येऊन पाच महिने उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंगळवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मंत्रिमंडळाच्या विस्तारबाबत स्पष्टता दिली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी एका मराठी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे. Cabinet expansion ahead of budget session; Information about Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, विस्ताराची प्रक्रिया बाकी आहे. कायदेशीर आणि घटनात्मकतेने हे सरकार पूर्णपणे स्थापित होऊन कार्यरत आहे. पण मंत्रिमंडळाचा विस्तार केला पाहिजे हे मला देखील वाटतं. कारण आपल्याकडे दोन सभागृह आहेत, विधानसभा आणि विधान परिषद.
त्यामुळे जेव्हा दोन्ही सभागृहात एकाच वेळेला सारख्या चर्चा चालतात किंवा सारखे विषय येतात. त्यावेळी ओढाताण होते. म्हणून मला असे वाटतेय की, हा विस्तार आम्हाला करायचा आहे. हा विस्तार आम्ही करू. मात्र या विस्तारामध्ये कायदेशीर आणि संविधानिक कोणतीही अडचण नाही. शक्यतो अर्थसंकल्प अधिवेशनाआधी तो आम्हाला करायचा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App