नेपाळच्या गंडकी नदीतील शाळिग्राम शिळेतून साकारणार अयोध्येच्या राम मंदिरातील मूर्ती!!


वृत्तसंस्था

अयोध्या : अयोध्येतील भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीसाठीचा शोध पूर्ण झाला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये रामजन्मभूमी मंदिराच्या ग्राउंड फ्लोअरच्या बांधकामाची डेडलाइन निश्चित झाल्यानंतर आता रामाच्या मूर्तीचे कोरीव काम वेळेत पूर्ण करण्याची तयारी सुरू झाली आहे. रामाची मूर्ती साडेपाच फूट उंचीची उभ्या मुद्रेत असेल. त्यासाठी लागणाऱ्या शाळिग्राम शिळेचा शोध पूर्ण झाला आहे. Ramlala idol to be carved out of gandaki shaligram sheila soon

या शिळेची व्यवस्था करण्यासाठी मंदिर ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांना नेपाळच्या गंडकी नदी परिसरात पाठवण्यात आले होते. तिथून 7 × 5 फूट आकाराची शाळिग्राम शिळा बाहेर काढण्यात आली असून जनकपूरमध्ये 27 जानेवारी रोजी वसंत पंचमीच्या दिवशी शिळेची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाईल. त्यानंतर ही शिळा जनकपूरहून मधुबनी – दरभंगा मार्गाने अयोध्येत आणली जाईल. नवभारत टाइम्सने ही बातमी दिली आहे.

शिलायात्रेदरम्यान दरभंगा, मधुबनी, मोतिहारी, गोपालगंज आणि गोरखपूर मंदिरात शिळेची पूजा आणि स्वागत केलं जाईल. यानंतर शाळिग्राम शिळा अयोध्येमध्ये आणली जाईल. कामेश्वर चौपाल यांनी सांगितलं की, शाळिग्राम शिळा यात्रा वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजेच 27 जानेवारीला जनकपूर येथून सुरू होईल. ती यात्रा 2 फेब्रुवारीपर्यंत अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे. नेपाळमधील भाविकांना जेव्हा कळलं की या खडकापासून अयोध्येतल्या रामललाची मूर्ती साकारली जाणार आहे, तेव्हापासून त्यांच्यामध्ये या शिळेची पूजा आणि स्वागत करण्यासाठी खूप उत्साह दिसून येतोय, असंही त्यांनी सांगितले.

शाळिग्रामाचे लाभ

कामेश्वर चौपाल म्हणाले की, हा शाळिग्राम खडक खूप महाग आहे. मात्र, नेपाळ सरकारच्या मदतीने तो मिळवण्यात आला आहे. या शाळिग्राम खडकाला धार्मिक महत्त्व आहे. यामध्ये भगवान विष्णूंचे निवासस्थान असल्याचे धर्मशास्त्र सांगते. शाळिग्राम शिळेत घडलेल्या मूर्तीचे सहा प्रकारचे लाभ आहेत. सुखी जीवन, समृद्धी, वाईट शक्तींपासून संरक्षण, उत्तम आरोग्य, वैश्विक आनंद आणि देवाची कृपा हे योग यातून बनतात, अशी मान्यता आहे.

पुरातत्व विभागाच्या तपासणीनंतर निवड

गंडकी नदीतील हा खडक निवडण्यासाठी नेपाळच्या पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती, असं कामेश्वर चौपाल यांनी सांगितलं. तज्ज्ञांच्या मदतीने उच्च दर्जाच्या दगडाची निवड करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

तज्ज्ञ घडवतील रामाची मूर्ती

राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील नामवंत कारागिरांची तीन सदस्यीय पथक रामाच्या मूर्तीचे डिझाईन आणि मॉडेल तयार करण्यासाठी काम करत आहे. उभ्या मूर्तीची अनेक छोटी मॉडेल्स आतापर्यंत आली आहेत. मंदिर ट्रस्ट त्यापैकी कोणत्याही एकाची निवड करेल. ही मूर्ती 5.5 फूट उंच असेल. याच्या खाली सुमारे 3 फूट उंचीचा पेडिस्ट्रियल असेल.

खगोलशास्त्रज्ञ मंदिराच्या रचनेसाठी विशेष व्यवस्था करत आहेत, जेणेकरून राम नवमीच्या दिवशी सकाळी 12.00 वाजता प्रभू राम जन्म झाल्यावर सूर्याची किरणे राम लल्लाच्या कपाळावर पडून ती प्रकाशमान होतील. पुढील वर्षी जानेवारीमध्ये मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर भव्य राम मंदिरात रामलल्लांच्या अभिषेकाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे, अशी माहितीही चंपत राय यांनी दिली.

Ramlala idol to be carved out of gandaki shaligram sheila soon

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात