विधान परिषद : शिवसेनेच्या सुहास कांदेंचे मत भाजपने घालवून दाखवले; जगताप, टिळकांच्या मतांवर काँग्रेसचा आक्षेप!!


प्रतिनिधी

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतावर आक्षेप घेऊन भाजपने त्यांचे मत रद्द करून दाखवले होते. आता त्याची परतफेड म्हणून शिवसेनेने नव्हे, तर काँग्रेसने भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोघांच्या मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेत दोघांची मते रद्द करण्याचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केला आहे. Maharashtra state council Elections : Congress objected voting of BJP MLAs laxman jagtap and mukta tilak

लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोघे गंभीर आजारी आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी घेऊन सहाय्यका मार्फत आपले मत मतपेटीत टाकले. मात्र ते स्वतः मतदान प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. स्वाक्षरी करू शकतात तर मत पेटीत टाकताना सहाय्यक मदत घेणे आक्षेपार्ह आहे. त्या सहायकाने पत्रिकेवर फेरफार केला नसेल कशावरून?, असा आक्षेप काँग्रेसच्या उमेदवारांनी नोंदवला आहे.


विधान परिषद : देशमुख – मालिकांच्या मतांसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत धावपळ; भाजपच्या दोन आमदारांच्या आजारांचे सामनातून झालेय “भांडवल”!!


त्यावरून राजकीय घमासान सुरू असून मतमोजणी प्रक्रिया लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनाही याच मुद्द्यावरून एकमेकांवर जोरदार तोफा डागल्या आहेत. दोन्ही आजारी आमदारांच्या मतदान प्रक्रियेवर आक्षेप नोंदवणे हा काँग्रेसच्या असंवेदनशीलतेचा कळस असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे, तर कायदेशीर आक्षेप घेण्यामध्ये गैर काय आहे?, असे प्रत्युत्तर अशोक चव्हाण आणि अमोल मिटकरी यांनी दिले आहे.

महाविकास आघाडीचा पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि म्हणूनच भाजपच्या दोन आजारी आमदारांच्या मतांवर त्यांनी आक्षेप घेतला आहे, असे शरसंधान सदाभाऊ खोत यांनी साधले आहे.

Maharashtra state council Elections : Congress objected voting of BJP MLAs laxman jagtap and mukta tilak

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!