विधान परिषद : देशमुख – मालिकांच्या मतांसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत धावपळ; भाजपच्या दोन आमदारांच्या आजारांचे सामनातून झालेय “भांडवल”!!


प्रतिनिधी

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत महाविकासआघाडी त्या तिन्ही घटक पक्षांकडे संख्या बळ असूनही नवाब मलिक आणि देशमुख तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या मतांसाठी आघाडीने सुप्रीम कोर्टापर्यंत धावपळ केली आहे. नाराज आमदारांची मते मिळवताना आघाडीच्या नेत्यांची दमछाक होत आहे, ते तर महाविकास आघाडीचे आमदार जमवता येत नाहीत म्हणून भाजपवर शरसंधान साधताना भाजपच्या दोन आमदारांच्या आजाराचे सामनाने “भांडवल” केले आहे. Deshmukh – Rush to Supreme Court for serial votes

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभेसाठी मतदान करता आले नाही. हायकोर्टाने त्यांना प्रतिबंध घातला होता. असाच प्रतिबंध विधान परिषद निवडणुकीसाठी देखील आहे. म्हणून या दोन्ही नेत्यांनी सुप्रीम कोर्टात मतदानाच्या परवानगीसाठी धाव घेतली आहे. शिवसेनेच्या आमदार यांच्या नाराजीची चर्चा ऐन मतदानाच्या वेळी रंगली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक आमदार ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने शिवसेनेबरोबर काँग्रेसची धाकधूक वाढली आहे.

राष्ट्रवादीचे 3 आमदार अण्णा बनसोडे दिलीप मोहिते आशुतोष काळे हे अजून मतदानाला पोहोचले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीची देखील धाकधूक वाढली आहे.

आधीच भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना भाजपने मतदानासाठी विशेष काळजी घेऊन डॉक्टरांच्या परवानगीनंतर आणल्यानंतरही सामनाने हाच का तुमचा चमत्कार? असे अशी खोचक टिप्पणी करत आजारी आमदारांचा जीव कशाला धोक्यात घालता? असा सवाल केला आहे.

प्रत्यक्षात मुक्ता टिळक यांनी पक्षनिष्ठा आमच्या रक्तात भिनली आहे, असे स्पष्ट करत त्या मतदानाला पोहोचल्या आहेत, तर लक्ष्मण जगताप यांची तब्येत महत्वाची आहे तब्येत बरी नसेल तर मतदान मनाला लागते सारे असे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले आहे मात्र लक्ष्मण जगताप यांचे बंधू यांचे बंधू शंकर जगताप यांनी पक्ष नेतृत्वाने सांगूनही लक्ष्मण जगताप मतदान करणार असल्याचे लक्ष्मण जगताप यांनी म्हटल्याचे स्पष्ट केले आहे.

Deshmukh – Rush to Supreme Court for serial votes

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात