Agnipath Scheme: सैन्याची तयारी 1989 पासून, अंमलबजावणी 2022 मध्ये; गैरसमज घालविण्यास प्राधान्य!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सैन्य भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ या नव्या योजनेला देशभरातून विरोध होत आहे. यासंदर्भात केंद्र सरकार नागरिकांचे गैरसमज दूर करत आहेत. सैन्य दलाने एक पत्रकार परिषद घेऊन या योजनेची तपशीलवार माहिती दिली आहे. या योजनेचा विचार गेल्या 33 वर्षांपासून सुरू असून, आता त्याची अंमलबजावणी होत असल्याचे Department of Miliatry Affairs(DMA) चे अतिरिक्त सेक्रेटरी अनिल पुरी यांनी सांगितले आहे. Agnipath Scheme: Preparation of troops since 1989, implementation in 2022

याचा अर्थ सन 1989 पासून म्हणजे काँग्रेसची राजवट असल्यापासून अग्निपथ योजनेवर विचार सुरू आहे. त्यावर अनेक साधक बाधक चर्चा झाल्या आहेत आणि या चर्चेअंती एक विशिष्ट फार्मूला तयार होऊन सन 2022 मध्ये अग्निपथ योजनेची अंमलबजावणी होत आहे.

सैन्याला तरुण वर्गाची गरज

देशात अग्निपथ योजना सुरू करण्यासाठी 1989 पासून विचार करण्यात येत आहे. यासाठी परदेशात असलेल्या सैन्य दलातील नियुक्त्या आणि तेथील एक्झिट प्लॅनचा संपू्र्ण अभ्यास केला आहे. त्यामुळे ही योजना सैन्य दलाला अधिक सक्षम करण्यासाठी हिताची असल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले.



– सरासरी वय 26

– भारताच्या सैन्य दलाला तरुण वर्गाची गरज आहे. सध्या सैन्य दलातील सैनिकांचे सरासरी वय हे 32 वर्ष आहे. हे वय कमी करुन 26 वर्षांपर्यंत आणण्याचा सैन्य दलाचा मानस आहे. देशातील सक्षम तरुण वर्गच जोखिम घेऊ शकतो. त्यामुळे ही योजना देशाच्या हिताची आहे, असेही अनिल पुरी यांनी सांगितले आहे.

– अग्निवीरांशी कोणताही भेदभाव नाही

सध्या सैन्य दलात भरती झालेल्या जवानांना ज्या सुविधा मिळत आहेत त्या सर्व सुविधा अग्निपथ योजनेद्वारे सैन्यात भरती होणा-या अग्निवीरांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे सेवा शर्तींमध्ये कोणताही भेदभाव करण्यात येणार नाही.

– 1 लाखापर्यंत वार्षिक भरती वाढणार

– येत्या 4 ते 5 वर्षांत 50 ते 60 हजार जवानांची सैन्यभरती होणार आहे. भविष्यात ही संख्या 90 हजार ते 1 लाख पर्यंत वाढणार आहे. त्यामुळे ही योजना सर्वप्रकारे देशाच्या आणि अग्निवीरांच्या हिताची असल्यामुळे ही योजना रद्द करण्याचा लष्कराचा कोणताही विचार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Agnipath Scheme: Preparation of troops since 1989, implementation in 2022

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात