विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jitendra Shelke भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा आज अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कारने समृद्धी महामार्गावर उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.Jitendra Shelke
जितेंद्र शेळके यांची भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशी सुरू होती. एसआयटीने त्यांचा जबाबही नोंदवला होता. ते या प्रकरणातील एक महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू अपघात की घातपात? याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.Jitendra Shelke
यासंबंधीच्या माहितीनुसार, जितेंद्र शेळके आज दुपारी 1 च्या सुमारास आपल्या कुटुंबासह छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात होते. रस्त्यात समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावालगत त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके व त्यांची पत्नी अनुराधा हे दोघे जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही धडक एवढी भीषण होती की, त्यांची कार थेट कंटेनरखाली घुसली. त्यामुळे तिचा अक्षरशः चुराडा झाला. जखमी मुलाला लगतच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
अपघातानंतर कार बराच वेळ कंटेनरखालीच होती
जितेंद्र शेळके यांची कार कंटेनरला धडकल्यानंतर बराच वेळ त्याच स्थितीत उभी होती. नंतर कुणीतरी ही माहिती पोलिस प्रशासनाला कळवली. त्यानंतर पोलिस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जितेंद्र शेळके, त्यांची पत्नी अनुराधा व मुलाला कारमधून बाहेर काढले. पण तोपर्यंत जितेंद्र शेळक व त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. हे तिघेही कारमध्ये बराच वेळ अडकले होते.
जितेंद्र शेळके भोंदू अशोक खरातचा विश्वासू सहकारी
मृत जितेंद्र शेळके भोंदू अशोक खरातचा अत्यंत जवळचा सहकारी होते. ते खरातच्या शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्यांचा जबाबही नोंदवला होता. त्यांची जवळपास 4 वेळा चौकशी झाली होती. त्यामुळे ते या प्रकरणातील एक महत्त्वाचे साक्षीदार होते. शेळके यांच्या मालकीच्या लॉन्समध्येही खरात याची भागीदारी होती. त्यामुळे खरातला अटक झाल्यामु्ळे शेळके प्रचंड तणावात होते. त्यातच आज त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे ही घटना केवळ अपघात आहे की, घातपात आहे? याविषयी वेगवेगळ्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत.
सुषमा अंधारेंनी व्यक्त केली घातपाताची शक्यता
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या अपघातावर संशय व्यक्त केला आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे. मला ही गोष्ट खरे तर अविश्वसनीय वाटते. कारण, गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांनी ही भीती किंवा शक्यता व्यक्त केली होती की, अशोक खरातचे एन्काउंटर होऊ शकते. त्याच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. आजच्या घटनेमुळे ही शक्यता अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे.
कदाचित खरात प्रकरणातील काही सत्यच बाहेर येऊ नयेत असे काही लोकांना वाटत आहे का? असे असले तरीही एसआयटी अजूनही तपासाची गती वाढवत नसेल, या लोकांच्या चौकशा होत नसतील, तर अजून जास्त संशयाचे धूके वाढत आहे. जितेंद्र शेळके हा गुन्हेगारच होता की नव्हता हे कायद्याने ठरवले असते. शिक्षा कायदा देईल. कुणाचा जीव घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. पण जी घटना आज घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे हे मात्र नक्की, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
खरातच्या शिवनिका ट्रस्टवर सध्या कोण-कोण?
राजकीय व प्रशासकीय पाठबळातून गत काही वर्षांत अशोक खरातच्या शिवनिका संस्थानला कोट्यवधींच्या देणग्या मिळाल्या होत्या. परंतु गोशाळेसाठी निधी संकलित करुनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाला. त्यातील तिघांनी राजीनामे दिले. सध्या संस्थानवर अध्यक्ष म्हणून अशोक खरात, उपाध्यक्ष म्हणून डॉ. जितेंद्र शेळके कार्यरत होते. सरचिटणीसपदी खरातची पत्नी कल्पना खरात असून, महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर, सुभाष गमे, ललित पोफळे, डॉ. नंदकिशोर कातोरे हे विश्वस्त मंडळावर आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App