शहरात चार भागात पायाचे ठसे असणारे इस्रायली झेंडे लावण्यात आले; पोलिसांकडून गुन्हा दाखल करत तपास सुरू
विशेष प्रतिनिधी
पुणे : इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास यांच्यात मध्यपूर्वेत सुरू असलेले युद्ध संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. त्याचा परिणाम जगाच्या कानाकोपऱ्यात दिसून येत आहे. दरम्यान भारतामध्येही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही जणांकडूनन केला जात आहे. In the background of Israel Hamas war there is an attempt to spoil the atmosphere in Pune
त्यात आता पुण्यात इस्रायलचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर इस्रायली झेंडे चिकटवण्यात आले असून, या झेंड्यांवर पायाचे ठसेही आढळून आले आहेत. पुण्यातील चार भागात हे झेंडे चिकटवण्यात आले होते.
पुणे याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून चार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कोण करत आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. खरे तर पुण्यात इस्त्रायली नागरिकांचे एक मोठे सिनेगॉग, म्हणजे त्यांचे धार्मिक स्थळ आहे. पोलिसांनी तिथे सुरक्षाही वाढवली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App