जोशी – महाजनांवरचा “पवार प्रयोग” फसला; फडणवीसांवरचा “जरांगे प्रयोग” यशस्वी होईल का??


महाराष्ट्र विधिमंडळाने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10 % आरक्षण दिले, पण ते न पटल्याने पुन्हा एकदा आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे आज अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खवळले आणि अरे तुरेच्या भाषेत त्यांच्यावर बेछूट आरोपकर्ते झाले. अगदी त्यांनी फडणवीसांवर विष प्रयोगाचा देखील आरोप करून घेतला, पण मनोज जरांगे यांच्या आरोपाची सगळी भाषा ही शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आधीच वापरल्यामुळे जरांगे त्यांच्या नव्या आक्रमकतेच्या दिवशीच उघडे पडले आणि त्यानिमित्ताने जरांगे यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले!! If sharad pawar failed to apply casteist experiment in maharashtra, how can manoj jarange will be successful??

येथे “सर्वपक्षीय नेते” असे म्हणताना काही किरकोळ अपवाद आहेत, हे विसरण्याचे कारण नाही. पण मनोज जरांगे यांची आरोपांची भाषा आणि त्याआधीची पवार + सुळे + ठाकरे आणि राऊतांची भाषा समान आहे हे लक्षात येताच उरलेले सर्वपक्षीय नेते एकवटले, असा याचा अर्थ आहे. कारण मनोज जरांगे यांचा तोल सुटला आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर बेछूट आरोपाच्या फैरी झाडल्या.

आत्तापर्यंत जरांगे यांचे आंदोलन पक्ष विरहित मानले गेले होते. त्यामुळे छगन भुजबळ आणि नारायण राणे वगळता कुठल्याच पक्षाचे कुठलेच नेते उघडपणे जरांगे यांच्या विरोधात बोलू शकत नव्हते. जरांगे यांची पहिल्यापासूनची भाषाच अरे तुरेची आणि आक्रमकतेच्या नावाखाली उर्मट होती. ती यशवंतराव चव्हाण यांच्या सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाशी सुसंगत तर अजिबातच नव्हती, उलट त्यांच्या भाषेत सुरुवातीपासूनच यशवंतरावांच्या सभ्य सुसंस्कृत राजकारणाचा ठेका आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्या पवार + सुळेंची भाषा बेमालूम पणे मिसळली गेली होती. इतके दिवस ती भाषा उघड्यावर आली नव्हती किंवा तिच्यातले साम्य समोर आले नव्हते.पण जरांगे यांचे एकेकाळचे समर्थक अजय महाराज बारस्कर आणि संगीता वानखेडे उघडपणे पुढे आले आणि त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनातल्या सगळ्या उणीवा उघडपणे समाजासमोर मांडल्या. त्यामुळे जरांगे भडकले आपण आणखी “एक्सपोज” होऊ या भीतीने त्यांनी थेट फडणवीसांवर हल्लाबोल केला. त्यातही तो जातीवाचक भाषेत केला. “बामनी कावा” असा शब्दप्रयोग त्यांनी वापरला. त्यामुळे त्यांची पवारांशी असलेली राजकीय संलग्नता सगळ्या महाराष्ट्रासमोर उघडी पडली… आणि इथेच वर उल्लेख केलेल्या शीर्षकाचा संबंध आहे!!

जोशी – महाजनांच्या हातात सत्ता देणार का??

1990 च्या दशकात शरद पवारांनी हिंदुत्वाच्या राजकारणाला प्रतिरोध करण्यासाठी ते “ब्राह्मणी राजकारण” असल्याची मखलाशी केली होती. त्यावेळी भाजपमध्ये प्रमोद महाजनांचे नेतृत्व उभरते होते आणि मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुत्वाचे तुफान आले होते. पवारांच्या सत्तेला खऱ्या अर्थाने राजकीय आणि सामाजिक हादरे बसले होते. त्यामुळेच पवारांनी त्यावेळी म्हणजे 1990 आणि 1995 या निवडणुकांमध्ये ब्राह्मण – ब्राह्मणेतर वादाला फोडणी दिली आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी तुम्ही जोशी महाजन यांच्या हातात सत्ता देणार का??, असा सवाल केला होता.

पण पवारांचे सत्तेचे राजकारण महाराष्ट्राने फार पूर्वीपासून ओळखले होते. त्यामुळे जनतेने बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना – भाजप युतीला सत्ता दिली. पवारांच्या नेतृत्वाखालच्या अखंड काँग्रेसचा पराभव केला आणि बाळासाहेबांनी मनोहर जोशींनाच मुख्यमंत्री केले. बाळासाहेबांचे राजकारण प्रखर हिंदुत्वाचे होते. ते पुरोगामी भाषेच्या आवरणातले जातीवादी राजकारण नव्हते. जी सवय पवारांना होती, ती बाळासाहेबांना अजिबात नव्हती. अर्थातच पवारांनी जोशी – महाजनांवर केलेला प्रयोग फसला. त्याची कबुली त्यांनीच नंतर एका मुलाखतीत दिली होती. ज्यावेळी जोशी महाजन हा प्रयोग फसला, त्यानंतर ब्राह्मण – ब्राह्मणेतर वादाला फोडणी देण्याचा प्रयत्न सोडून दिला होता, असे पवार त्या मुलाखतीत म्हणाले होते.

जोशी – महाजनांवरचा पवारांनी केलेला प्रयोग तेव्हा फसला असेल, तर आज जेव्हा देशात आणि महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी राजकारणाची तुफानापलीकडची सुनामी उठली आहे, त्यावेळी फडणवीसांवरचा “जरांगे प्रयोग” यशस्वी होण्याची शक्यता तरी आहे का??, हा खरा सवाल आहे.

नेते एकवटले

जरांगेंचा आज तोल सुटल्याबरोबर भाजपचे नेते आशिष शेलार, नितेश राणे, प्रसाद लाड हे तर आक्रमकपणे पुढे आलेच, पण त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय शिरसाट, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या आक्रमकतेचा तितक्याच आक्रमकतेने पुढे येऊन मुकाबला केला. बच्चू कडूंनी जरांगे यांना आंदोलनाला वेगळे जातीवादी वळण लावू नका, असा स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला.

एक तर मुख्यमंत्र्यापदाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेच होते, ते त्यांनी हायकोर्टापर्यंत टिकवून दाखवले होते. परंतु त्यानंतर ठाकरे – पवार सरकारच्या काळात ते आरक्षण त्यांच्या सरकारला सुप्रीम कोर्टात टिकवता आले नव्हते. पण फडणवीसांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निमित्ताने तसेच “सारथी” संस्थेच्या निमित्ताने मराठा समाजाला विशेषता विद्यार्थ्यांना भरपूर मदतीच्या आणि सवलतीच्या योजना दिल्या होत्या. त्या ठाकरे – पवार सरकारने बंद केल्या होत्या, पण शिंदे – फडणवीस सरकारने त्या पुन्हा चालू केल्या, या सर्व मुद्द्यांकडे या सगळ्याच नेत्यांनी आवर्जून लक्ष वेधले.

याखेरीज शिंदे – फडणवीस सरकारने विधिमंडळाचे एक दिवसाचे अधिवेशन बोलवून एकमताने मराठा समाजाला 10 % आरक्षणाचा निर्णय घेतला. ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टिकवण्याची 100 % हमी घेतली. त्यामुळे मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आश्वासन 100% पूर्ण झाले.

जरांगे आणि मास्टरमाईंड असमाधानी

इथेच नेमकी “खटकी” पडली. मात्र, मनोज जरांगे आणि त्यांच्या मास्टरमाईंडचे समाधान झाले नाही. ओबीसींमधलाच आरक्षणाचा वाटा पाहिजे या हट्टला ते पेटले होते आणि मराठा आरक्षण विधिमंडळात संमत झाल्यानंतर त्यांच्या हातातले आरक्षणाचे हत्यार गळून पडले होते. त्यातच त्यांच्या आंदोलनातल्याच माजी सहकाऱ्यांनी त्यांच्यावर थेट हेतूंचेच आरोप केल्याने जरांगे “एक्सपोज” होत चालले होते. त्यामुळे ते आज अक्षरशः “फ्रस्ट्रेट” झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जातीवादी शब्दात थेट हल्लाबोल केला, पण त्यामुळे फडणवीसांभोवती सर्वपक्षीय नेते एकवटले आणि आत्तापर्यंत मनोज जरांगेंना जे नेते वेगवेगळ्या कारणांसाठी विरोध करू शकत नव्हते, त्यांनी उघडपणे जरांगेंच्याच आक्रमक भाषेत त्यांना प्रत्युत्तर दिले.

सरकारकडे नैतिक बळ

हे सहज घडलेले नाही. त्यामागे शिंदे – फडणवीस सरकारचे कष्ट आणि प्रयत्न होते. त्यांनी प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यामुळे फडणवीसांभोवती उभे राहताना सर्वपक्षीय आमदारांना आणि नेत्यांना एक नैतिक बळ मिळाले. असे नैतिक बळ टप्प्याटप्प्याने मनोज जरांगे यांनी गमावले. कारण त्यांचे आंदोलन एका पक्षाच्या किंबहुना शरद पवारांच्या कह्यात गेल्याचेच महाराष्ट्रासमोर उघड्यावर आले. त्यातूनच आज जरांगेंना “फ्रस्टेशन” आले. ते थेट फडणवीसांवर आरोपकर्ते झाल्यामुळे यांच्या आंदोलनाविषयी मूलभूत शंकाच तयार झाली. या अर्थाने जसा 1990 च्या दशकात शरद पवारांचा जोशी – महाजन यांच्यावरचा प्रयोग फसला होता, तशीच गत फडणवीसांवरच्या मनोज जरांगे यांच्या प्रयोगाची होणार आहे, हे उघड गुपित आहे!!

If sharad pawar failed to apply casteist experiment in maharashtra, how can manoj jarange will be successful??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात