उत्तर प्रदेश : कौशांबीमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, चार जणांचा मृत्यू!


या घटनेत अजूनही अनेक लोक अडकले असून त्यांची सुटका करण्यात येत आहे.


विशेष प्रतिनिधी

उत्तर प्रदेशमधील कौशांबी येथील फटाक्यांच्या कारखान्यात रविवारी स्फोट झाला. जिल्ह्यातील कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरवारी शहरातील शराफत अली येथे ही घटना घडली. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे लग्नसमारंभासाठी फटाके बनवले जात होते. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस कर्मचारी तेथे पोहोचलेUttar Pradesh Four people died in a firecracker factory explosion in Kaushambi



घटनास्थळी एसपी ब्रिजेश श्रीवास्तव यांच्यासह अनेक पोलिस ठाण्याचे फौजफाटा उपस्थित आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. या घटनेची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहे. योगी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या घटनेतील जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, फटाक्यांच्या कारखान्यात झालेला स्फोट इतका भीषण होता की फटाक्यांचे तुकडे कित्येक किलोमीटर दूर उडून गेले. या घटनेबाबत माहिती देताना एसपी ब्रिजेश कुमार श्रीवास्तव म्हणाले, “फटाका बनवण्याच्या कारखान्यात आग लागली असून, या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण जखमी झाले आहेत, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे. .”

या घटनेत अजूनही अनेक लोक अडकले असून त्यांची सुटका करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान पोलीस आणि स्थानिक बचावकर्ते मदत करत आहेत. हा कारखाना प्रयागराज कानपूर हायवेजवळ आहे. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी तेथील प्रशासनाचा निषेधही केला आहे. हा कारखाना कौशल अली नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Uttar Pradesh Four people died in a firecracker factory explosion in Kaushambi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात