दिल्लीतील भाजपा मुख्यालयात रविवारी दुपारी रितेश पांडेंनी भाजपाचे सदस्यत्व घेतले
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथील खासदार रितेश पांडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. ते यापूर्वी बहुजन समाज पक्षाचे खासदार होते. रविवारी सकाळीच त्यांनी बसपचा राजीनामा दिला होता.MP Ritesh Pandey joined BJP resigned from BSP
राजीनामा दिल्यानंतर रितेश पांडे यांनी बसपवर आरोप केला होता की, त्यांना पक्षाच्या बैठकीला बोलावले जात नाही किंवा नेतृत्व पातळीवर कोणताही संवाद साधला जात नाही. पक्षाला आता आपली गरज नाही असे वाटू लागले आहे आणि त्यामुळे राजीनामा देण्याशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले होते.
रविवारी दुपारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात रितेश पांडेने सर्वांसमोर पक्षाचे सदस्यत्व घेतले. यावेळी भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. रितेश पांडे हे अनेक दिवसांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते. तर रितेश पांडे यांनी बसपच्या राजीनाम्यावरून त्यांचे नाव न घेता पक्षप्रमुख मायावती यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App