अखिलेश यादव राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सामील होणार, पण तिला PDA यात्रा म्हणणार!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव सामील होणार, पण त्याला राहुल गांधींनी दिलेल्या भारत जोडो न्याय यात्रा न संबोधता अखिलेश त्या यात्रेला PDA यात्रा म्हणणार आहेत. हे चित्र खरंच उद्या (रविवारी) उत्तर प्रदेशात दिसणार आहे.Akhilesh Yadav will join Rahul Gandhi’s Bharat Jodo Nyaya Yatra, but will call it PDA Yatra!!अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेसला आपल्याबरोबरच्या आघाडीत सामील करून घेतले. पण लोकसभेच्या 80 जागांपैकी फक्त 17 जागांवर त्यांनी काँग्रेसची बोळवण केली त्यामुळे काँग्रेसचे उत्तर प्रदेशातले उरलेले नेते चिडले आहेत, पण काँग्रेसच्या हायकमांड पुढे त्यांचे काही चालले नाही. शिवाय राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशातल्या वेगवेगळ्या शहरांमधून जात असल्यामुळे ते अखिलेश यादव किंवा बाकी कुठल्याही पक्षाच्या नेत्यांशी वाद घालायला त्यांना बिलकुल वेळ नाही.

काँग्रेस नेत्यांच्या या मजबुरीचा फायदा अखिलेश यादव यांनी पुरेपूर उचलला आहे. लखनऊ मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत तुम्ही सामील होणार का??, असा एका प्रश्न पत्रकाराने प्रश्न विचारताच त्यांनी त्याला होकारात्मक उत्तर दिले. पण आपण सामील होणारी यात्रा PDA अर्थात पिछडे – दलित – आदिवासी यात्रा असेल, असे अखिलेश यादव म्हणाले.

याचा अर्थच त्यांनी राहुल गांधींपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. अखिलेश यादवांनी काँग्रेसला उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 पैकी फक्त 17 जागा दिल्याने आधीच तिथले पक्ष कार्यकर्ते चिडले आहेत. त्यात अखिलेश यादव यांनी राहुल गांधींच्या यात्रेला भारत जोडो यात्रा न म्हणता PDA यात्रा म्हटल्याने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे.

Akhilesh Yadav will join Rahul Gandhi’s Bharat Jodo Nyaya Yatra, but will call it PDA Yatra!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात